भरधाव कारनं तिघांना चिरडलं; गोंदिया हिट अँड रननं हादरलं,Video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना भरधाव कारनं उडवलं या अपघातामध्ये तीन जण गंंभीर जखमी झाले आहेत.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना भरधाव कारनं उडवलं, हा हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. भरधाव कारनं तिघांना उडवलं त्यातील दोघांची प्रकती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शहरातील एका खसगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदियात हिट अँड रन थरात बघायला मिळाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, गोरेगाव वरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर भरधाव कारणे रोडच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एक सायकलस्वाराला उडवले, या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर व सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना भरधाव कारनं उडवलं, हा हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. pic.twitter.com/74IL2VXRAE
— News18Lokmat (@News18lokmat) September 2, 2024
कार चालक भर वेगाने गोंदिया शहरातील गणेशनगरकडे जात असताना ही घटना घडली आहे. खोमेश उरकुडे वय 24 वर्ष रा. कोसेटोला, गोरेगाव असे या कारचालकाचं नाव आहे. तर हेमराज राऊत वय 54 रा. कारंजा, कादीर शेख वय 38 रा. फुलचुर आणि एक सायकस्वार या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, दोघंजण रस्त्याच्या कडेला बसले आहेत. तर एक सायकस्वार रस्त्यात्याने जात असताना पाठिमागून एक भरधाव कार येते या कारने या तिघांना उडवल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
view commentsLocation :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
September 02, 2024 1:39 PM IST


