Nana Patole On Thackeray : ठाकरेंना मतदान करू नये, मुस्लिम संघटनेचं आवाहन! नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला

Last Updated:

Nana Patole On Thackeray : मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करू नये, असं आवाहन एका मुस्लिम संघटनेने केलं आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले
काँग्रेस नेते नाना पटोले
गोंदिया, (रवी सपाटे, प्रतिनिधी) : मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतल्या मुस्लिम समाजाने नोटाला मतदान करावं, असं आवाहन मुस्लिम सेवाभावी संस्थांनी केलं आहे. मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंवर नाराज असून त्यांच्या पक्षाला आमचा पाठिंबा नसल्याचं मुस्लिम सेवाभावी संस्थांचं म्हणणं आहे. यावर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले म्हणाले की कोणत्याही सामाजिक संघटनेला अशा प्रकारे कागद काढून लोकांना मतदान करण्यापासून वंचित ठेवता येत नाही.
पाचव्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर देश वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी लोक महाविकासाला मतदान करणार आहेत. मी स्वतः विविध सामाजिक संघटनेच्या लोकांशी भेटलो आहे. त्यांची कोणती अशा प्रकारची भूमिका नाही. कुणी अशा प्रकारच्या अफवा पसरवीत असेल तर मला माहित नाही, असे नाना पटोले म्हणाले.
राजकीय प्रश्नापेक्षा शेतकरी, आरोग्य आणि बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे : नाना पटोले
छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला होता की जर मी त्यावेळेस शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर काँग्रेसमध्ये असतो तर कदाचित मी मुख्यमंत्री झालो असतो. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की जर तरला राजकारणामध्ये कोणतेही स्थान नसते. त्यामुळे ते काय बोलले याला काही महत्त्व नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आज देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारा उडालेला आहे. देशांमध्ये गरिबांचे अन्नधान्यासाठी अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. हे प्रश्न काँग्रेसला महत्त्वपूर्ण आहेत. फालतूच्या राजकीय चर्चेपेक्षा काँग्रेस यांना महत्त्व देते, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला.
advertisement
पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीला भरभरून मतदान करतील : नाना पटोले
महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या होत असून यात 13 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे, याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की गेल्या चार टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिला आणि या पाचव्या टप्प्यातही मी सर्व लोकसभा क्षेत्र फिरलो. लोक मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करतील अशी अपेक्षा त्यांनी गोंदिया येथील सडक अर्जुन येथे व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Nana Patole On Thackeray : ठाकरेंना मतदान करू नये, मुस्लिम संघटनेचं आवाहन! नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला
Next Article
advertisement
BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement