Crime News : पैशांच्या वादातून टोळक्याचा कोयत्याने हल्ला; तरुणाच्या हत्येनं गोंदिया हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून टोळक्यानं तरुणाची हत्या केली आहे. त्याच्यावर कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड आणि काठीनं हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मनीष उर्फ ईश्वर भालाधरे वय 30 वर्ष रा. कुडवा असे मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणातील पाच पैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील एमआयटी कॉलेज जवळ एक 30 वर्षीय तरुणावर पैशांच्या वादातून 5 लोकांनी कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, तसेच काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनीष उर्फ ईश्वर भालाधरे वय 30 वर्ष रा. कुडवा असे या तरुणाचे नाव आहे.
advertisement
तर संतोष मानकर वय 50 वर्ष, लकी उर्फ लोकेश मानकर वय 21 वर्ष, पवन मानकर वय 23 वर्ष, तुषार हट्टेवार वय 19 वर्ष आणि जॉर्डन शेंडे वय 20 वर्ष सर्व रा. कुडवा असे आरोपींची नावं आहेत. या सर्व आरोपींनी मिळून मनीषवर हल्ला केला. त्याची हत्या करण्यात आली. 5 आरोपींपैकी एका आरोपीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Location :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
Jan 07, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Crime News : पैशांच्या वादातून टोळक्याचा कोयत्याने हल्ला; तरुणाच्या हत्येनं गोंदिया हादरलं










