Gondiya Shivshahi Accident : 'ड्युटीवर आता कायमची गैरहजेरी पडली', शिवशाही अपघात पोलीस कर्मचारी स्मितांचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:sachin Salve
Last Updated:
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात खजरी गावाजवळ शिवशाही बसला आज दुपारी हा अपघात झाला होता. आतापर्यंत मृतांचा आकडा 11 वर पोहोचला
रवी सातपुते, प्रतिनिधी
गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पतीच्या जागेवर या महिलेची पोलीस दलात निवड झाली होती. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात खजरी गावाजवळ शिवशाही बसला आज दुपारी हा अपघात झाला होता. आतापर्यंत मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तर 3 जण गंभीर जखमी असून 26 जण किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 2 मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही.
advertisement
या अपघातात स्मिता सूर्यवंशी या 32 वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला. स्मिता सूर्यवंशी या अलीकडे पोलीस दलात भरती झाल्या होत्या. स्मिता सूर्यवंशी या आपल्या पतीच्या जागी पोलीस दलात अनुकंपामध्ये भरती झाल्या होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघात झाला त्या समयी बसमध्ये जवळपास 50 ते 55 प्रवासी प्रवास करत होते. जखमींमध्ये जवळपास 30 ते 35 लोकं जखमी आहेत. यामध्ये वृद्ध आणि बालकांच्याही समावेश आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
या अपघातील मृतांची नाव
1) स्मिता सूर्यवंशी (32) रा. मोरगाव अर्जुनी (पोलीस कर्मचारी)
2) मंगला राजेश लांजेवार (60) राहणार पिपरी जिल्हा भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार राहणार पिपरी जिल्हा भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे (65) राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर..
5) रामचंद्र कनोजे (65) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा..
6) अंजिरा रामचंद्र रामचंद्र कनोजे (60) राहणार चांदोरी साकोली जिल्हा भंडारा
advertisement
7) आरिफ अजहर सय्यद (42) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
8) अजहर अली सय्यद (55) राहणार घोटी गोरेगाव गोंदिया
9) नयना विशाल मिटकरी (35) राहणार बेसा जिल्हा नागपूर
10) अनोळखी पुरुष
11) अनोळखी पुरुष
दरम्यान, गोंदिया शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहे.
Location :
Gondiya (Gondia),Gondiya,Maharashtra
First Published :
November 29, 2024 8:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gondiya Shivshahi Accident : 'ड्युटीवर आता कायमची गैरहजेरी पडली', शिवशाही अपघात पोलीस कर्मचारी स्मितांचा दुर्दैवी मृत्यू