आदमापूरच्या बाळूमामांसमोर सर्व भक्त समान; आता VIP दर्शन मिळणार नाही, देवस्थान समितीने घालून दिले 'हे' नियम

Last Updated:

Kolhapur News : कोल्हापूरमधील प्रसिद्ध संत सदगुरु श्री बाळूमामांचे दर्शन आता सर्वसामान्यांसाठी अधिक सोपे झाले आहे. आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री बाळूमामा देवस्थान समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News : कोल्हापूरमधील प्रसिद्ध संत सदगुरु श्री बाळूमामांचे दर्शन आता सर्वसामान्यांसाठी अधिक सोपे झाले आहे. आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री बाळूमामा देवस्थान समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
आता सर्व भक्तांना कसं मिळणार दर्शन?
बाळूमामांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि सर्व भाविकांना समान वागणूक मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणालाही विशेष वागणूक दिली जाणार नाही. सर्व भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागेल.
आता बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तीन पर्यायांचा वापर करावा लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे आणि चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. मुखदर्शनासोबतच पायरी दर्शनाचीही व्यवस्था आहे.
advertisement
या दोन्ही बाजूला भंडारा लावण्यासाठी आणि श्रीफळ-प्रसाद अर्पण करण्यासाठी स्वतंत्र सोय आहे. देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी सांगितले की, भाविकांना सोपे आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी आणखी नवीन योजना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाळूमामांचे पुतळे ठेवण्यास बंदी
देवस्थान समितीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदमापूर परिसरात काही दुकानांसमोर बाळूमामांचे पुतळे ठेवले जातात. यामुळे बाळूमामांच्या प्रतिमेला बाधा पोहोचू शकते. म्हणून, बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र्य जपण्यासाठी अशाप्रकारे पुतळे ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आदमापूरच्या बाळूमामांसमोर सर्व भक्त समान; आता VIP दर्शन मिळणार नाही, देवस्थान समितीने घालून दिले 'हे' नियम
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement