'तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही', बापुबिरूच्या पोराने गोपीचंद पडळकरांना भरला सज्जड दम!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shivaji vategaonkar On Gopichand Padalkar : तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर टीका केली आहे.
Gopichand Padalkar Controversy : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला होता. पडळकरांच्या या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा दिला अन् दम देखील भरला आहे.
तुझे कपडे काढूनच पाठव - शिवाजी वाटेगावकर
जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का, तू कदाचित या वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर टीका केली आहे. धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली. बापूंसारख्यांवर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू..., असं म्हणत त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
advertisement
तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही - शिवाजी वाटेगावकर
वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो. तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना इशारा दिला आहे. तसेच शरद पवार गटाने देखील गोपीचंद पडळकरांना टीका केली आणि राज्यभर आंदोलनं केली आहेत. या प्रकरणावर खुद्द शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून फडणवीसांनी पडळकरांना समज देखील दिला आहे.
advertisement
मला शरद पवारांचा फोन आला - देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य आहे, असं माझंही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितलं, अशा प्रकारच्या विधानाचं आम्हीही कधीच समर्थन करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही', बापुबिरूच्या पोराने गोपीचंद पडळकरांना भरला सज्जड दम!