कमी खर्चात जास्त नफा; गव्हाचे 'हे' वाण ठरतील सर्वात फायदेशीर, कराल बक्कळ कमाई

Last Updated:

यंदा मान्सून जोरदार बरसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, रब्बी हंगामात मान्सून च्या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने रबी पेरणी करू लागले आहेत.

+
गहू

गहू पेरणी

यंदा मान्सून जोरदार बरसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, रब्बी हंगामात मान्सून च्या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने रबी पेरणी करू लागले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बी हंगामात गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. पाहुयात गव्हाच्या कोणत्या उन्नत जाती आहेत ज्या चांगले उत्पादन देऊ शकतात.
'फुले समाधान' या जातीचे गहु बाजारात उपलब्ध आहे. त्याचबरोबर उत्पादन चांगले असून या गव्हाची चपाती देखील चांगली तयार होते. 'फुले त्र्यंबक' जातीचे गहु महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आहे. उत्पादन तसेच खाण्यासाठी चांगला आहे. 110 ते 120 दिवस कालावधीत येतो, मध्यम ते भारी जमिनीत येतो. 'तपोवन' या जातीचे गहु देखील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. PDKV वाशिम या जातीचे गहु चपातीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गावरान गव्हासारखा तो गहु आहे. अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले गहु आहे.
advertisement
उशीरा पेरणीसाठी फुले शाश्वत या जातीचे गहु उपयुक्त आहे. त्याच बरोबर नेत्रावती या जातीचे गहु देखील चांगला आहे. बेकार उपयोगासाठी फुले सात्विक या जातीचे गहु उत्तम आहे. फुले अनुपम या जातीचे गहु देखील एक नवीन आणि चांगले उत्पादन देणारे आहे. लोकवन या जातीच्या गव्हाची देखील शेतकरी पेरणी करतात. खपली गहू हा औषधीगुण असलेला गहू आहे. याचीही मागणी होत असते. MSCS 2971, DDK1025, DDK1029 या जातीचे गहु देखील शेतकरी विचारात घेऊ शकातात. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची परिस्थिती, पेरणीची तारीख आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करून गव्हाच्या जातीची निवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र खरपुडी चे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ एस व्ही सोनूने यानी केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कमी खर्चात जास्त नफा; गव्हाचे 'हे' वाण ठरतील सर्वात फायदेशीर, कराल बक्कळ कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement