मी मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसलो कारण...; उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या निर्धार सभेतून भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
हिंगोली, 27 ऑगस्ट, उदय तिमांडे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीमधल्या रामलीला मैदानावर निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. एनडीएमध्ये कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे का? असा सवाल करतानाच आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असं आहे, तर भाजपमध्ये सगळे आयाराम आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्यात सत्तेमध्ये असलेल्या भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार खोक्यातून जन्माला आले नाही हे शपथ घेऊन सांगा. हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांचा हात पकडला आणि ईडी त्यांचे पत्र विसरली. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
advertisement
दरम्यान 'इंडिया'च्या पहिल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची असन व्यवस्था ही पीडीपीच्या नेत्या मेहुबा मुफ्ती यांच्या शेजारी होती, यावरून भाजपने ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपच्या या टीकेला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या सोबत मी बसलो करण त्या  तुमच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतलेल्या आहेत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
advertisement
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की मी भाजपसोबत युती तोडली पण तरीही मला त्यांच्या कार्यकर्त्यांची दया येते. भाजपमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी सगळं सोडून पक्षाला मोठं केलं. मात्र आज ते फक्त झेंड्यापुरते उरले आहेत. पक्षात सगळा आयारामांचा भरणा झाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
मी मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसलो कारण...; उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement