Nashik News: 1 मिनिटं ते परीचे लचके तोडत होते, खेचून घेऊन जात होते, काळीज धस्स करणारा येवल्यातला LIVE VIDEO
- Published by:sachin Salve
Last Updated:
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार?
येवला : नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका 11 वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवल्याच्या बदापूर रोडवर ही घटना घडली आहे. परी करवरं असं या मुलीचं नाव आहे. ही चिमुरडी मोकळ्या मैदानातून जात होती. त्यावेळी समोरून एक कुत्रा भुंकत होता. परीने बचावासाठी दगडं उचलून मारली. या कुत्र्याचा आवाज ऐकून आजूबाजूची आणखी पाच ते ७ कुत्री धावून आली. परीने त्यांना हकलण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत 5 ते 7 भटके कुत्रे तिच्या अंगावर धावून गेली.
advertisement
11 वर्षाच्या चिमूरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला,हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी, येवल्याच्या बदापूर रोडवरील धक्कादायक घटना pic.twitter.com/EDZSoAU6dP
— News18Lokmat (@News18lokmat) January 7, 2025
तिच्या हाताला, पायाला चावा घेतला. मैदानात त्यावेळी या मुलीच्या जवळ फारसं कुणीही नव्हतं. या कुत्र्यांनी अक्षरशः तीचे लचके तोडले. एवढंच नाहीतर हे कुत्रे परीला फरफटत घेऊन चालले होते. परीचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक तीच्या मदतीला धावून आले. लोकांनी तीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
advertisement
परीच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली तीला तातडीने शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं मात्र तीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे परीला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
January 07, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News: 1 मिनिटं ते परीचे लचके तोडत होते, खेचून घेऊन जात होते, काळीज धस्स करणारा येवल्यातला LIVE VIDEO