Hotel BHagyashree : नाद करती काय, यायलाच लागतंय, हॉटेल भाग्यश्रीच्या मालक मराठ्यांसाठी निघाले मुंबईला, VIDEO VIRAL
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मराठ्यांचे जेवणाचे, पिण्याच्या पाण्याचे आणि झोपण्याचे प्रचंड हाल होत आहे.हे पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.यात आता भाग्यश्री हॉटेलचे मालक देखील पुढे सरसावले आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
Manoj jarange Patil Hotel Bhagyshree : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा दुसरा दिवस पार पडला आहे. आता उद्या रविवारी तिसऱ्या दिवशी देखील मनोज जरांगे पाटील अशाचप्रकारे उपोषण करणार आहेत.मराठ्यांच्या या उपोषणा दरम्यान आदोलकांची मोठी गैरसाय होती.मराठ्यांचे जेवणाचे, पिण्याच्या पाण्याचे आणि झोपण्याचे प्रचंड हाल होत आहे.हे पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.यात आता भाग्यश्री हॉटेलचे मालक देखील पुढे सरसावले आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
नाद करती काय,यायला लागतंय अशा आशयाची रिल्स तुम्ही तुमच्या इस्टाग्राम फिडवर नक्कीच पाहिली असेल. या सोशल मीडियावर फेमस असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी मराठा आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.नागेश मडके यांनी ट्रकभरून बिस्लेरी पाण्याच्या बॉटल मुंबईच्या दिशेने पाठवल्या आहेत.या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये ते नेमकं काय म्हणालेत? ते पाहूयात.
advertisement
हॉटेल भाग्यश्री चे मालक मुंबई मधील मराठा आंदोलक यांच्या साठी पाण्याच्या बॉटल्स घेऊन येत आहेत तरी त्यांचे सकल मराठा समाज याच्या कडून खूप खूप धन्यवाद.#नाद_करती_काय #MarathaReservation #ManojJarangePatil #Mumbai #मनोज_जरांगे_पाटील #hotel_bhagyshree pic.twitter.com/T0vBJIGUoq
— मराठायोद्धा (@Maratha_Yodhaa) August 30, 2025
advertisement
मराठायोद्धा या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धाराशीव मधून हत्ती घेऊन मराठा बांधवासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहे. बिस्लेरीच्या पाण्यांच्या बॉटलने भरलेला हत्ती घेऊन निघालो आहे.आमच्या भावाला फोन लावून थेट बिस्लेरीच्या बॉटल्सनी हत्तीच भरायला लावला आहे.त्यामुळे नागेश मडकेंने धाराशीवमधून मुंबईत मराठा बांधवांसाठी पाणी पाठवत आहेत.
advertisement
या व्हिडिओत नागेश मडके म्हणतात की, तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.मनोज दादा जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठू नका. जितकी आपल्याला कमी पडेल तितकं आम्ही आणून द्यायला तयार आहोत,असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सकल मराठा समाजाकडून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे खुप आभार मानले आहेत. आणि या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
तिरंगा हॉटेलला मदतीचा हात
तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांची ही भीषण परिस्थिती पाहून भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी त्यांना धीर दिला होता. आमचे धाराशीव जिल्ह्यामधले तिरंगा हॉटेलचे मालक त्याचे काही व्हिडिओ बघितले. त्यामुळे पुरामुळे त्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई शासनातर्फे मिळावी. युवा उद्योजकाला काय मदत होईल तितकी करण्यात यावी,अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे. त्याचसोबच खचून जाऊ नका भाऊ, धाराशीव जिल्हा तुमच्यासोबत आहे, हॉटेल भाग्यश्री, नाद करती काय हॉटेल तिरंगा, अशा धीर देण्याचा प्रयत्न नागेश मडके यांनी केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hotel BHagyashree : नाद करती काय, यायलाच लागतंय, हॉटेल भाग्यश्रीच्या मालक मराठ्यांसाठी निघाले मुंबईला, VIDEO VIRAL


