Tiranga Hotel VIDEO : दोस्त धावून आला! तिरंगा हॅाटेलचं मोठं नुकसान,मालकाला आलं रडू, भाग्यश्रीच्या मालकाने दिला धीर

Last Updated:

हॉटेल तिरंगामध्ये पुरामुळे पाणी शिरल्याची घटना घडली. या पुरामुळे हॉटेल तिरंगा हॉटेलचे नुकसान झाले आहे.अशा कठीण प्रसंगी आता भाग्यश्री हॉटेलचा मालकाने तिरंगा हॉटेलच्या मालकाला धीर दिला आहे.

Tiranga Hotel Bhagyashree Hotel
Tiranga Hotel Bhagyashree Hotel
Tiranga Hotel Bhagyashree Hotel : नाद करती काय, यायलाच लागतंय,आता पाच कापले आहेत आणि आता फक्त दुपारचे दोन वाजले आहेत, संध्याकाळी 4 चं नियोजन आहे. यायलाच लागतंय, कुठं हॉटेल तिरंगा...अशा आशयाची रिल्स तुम्ही तुमच्या इस्टाग्राम फिडवर नक्कीच पाहिली असेल. या सोशल मीडियावर फेमस असलेल्या हॉटेल तिरंगामध्ये पुरामुळे पाणी शिरल्याची घटना घडली. या पुरामुळे हॉटेल तिरंगा हॉटेलचे नुकसान झाले आहे.अशा कठीण प्रसंगी आता भाग्यश्री हॉटेलचा मालकाने तिरंगा हॉटेलच्या मालकाला धीर दिला आहे.
advertisement
बार्शी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या तिरंगा हॉटेलला पावसाचा फटका बसला होता. विश्वरूप नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तिरंगा हॉटेलमध्ये पाणी शिरलं होतं. हॉटेलमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे हॉटेलमधील साहित्यांचा नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे हॉटेल मालक लक्ष्मण भोसले यांना अश्रू अनावर झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Laxman Bhosale (@hotel_tiranga8055)



advertisement

भाग्यश्री हॉटेलच्या मालकाने दिला धीर

तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांची ही भीषण परिस्थिती पाहून भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी त्यांना धीर दिला होता. आमचे धाराशीव जिल्ह्यामधले तिरंगा हॉटेलचे मालक त्याचे काही व्हिडिओ बघितले. त्यामुळे पुरामुळे त्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई शासनातर्फे मिळावी. युवा उद्योजकाला काय मदत होईल तितकी करण्यात यावी,अशी मागणी नागेश मडके यांनी केली आहे. त्याचसोबच खचून जाऊ नका भाऊ, धाराशीव जिल्हा तुमच्यासोबत आहे, हॉटेल भाग्यश्री, नाद करती काय हॉटेल तिरंगा, अशा धीर देण्याचा प्रयत्न नागेश मडके यांनी केला.
advertisement
दरम्यान रिलच्या माध्यमातून व्यवसायाची स्पर्धा दाखवणारे रिल्स प्रचंड चर्चेत असतात. तसेच हे हॉटेल मालक एकमेकांच्या कठीण प्रसंगातही धावून येतात. मध्यंतरी हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. या घटनेत हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर आणि बोर्ड फाडण्यात आले होते. यामुळे त्यांचे 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली होती.
advertisement
advertisement
भाग्यश्री हॉटेलसोबत झालेल्या या कृत्यानंतर तिंरगा हॉटेलच्या मालकाने प्रतिक्रिया दिली होती.व्यवसाय उभं करणं खूप कठिण गोष्ट आहे. त्यामुळे असं एखाद्यासोबत करू नका,असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.तसेच भाग्यश्रीच्या मालकानी खचून जाऊ नये,असे म्हणत भोसले यांनी नागेश मडकेला धीर दिला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tiranga Hotel VIDEO : दोस्त धावून आला! तिरंगा हॅाटेलचं मोठं नुकसान,मालकाला आलं रडू, भाग्यश्रीच्या मालकाने दिला धीर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement