Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? शरद पवार शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या भेटीला

Last Updated:

शरद पवार हे महाविकासआघाडीमधीलच आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का देणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलंय शरद पवारांनी घेतलेली उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याची भेट.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? शरद पवार शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या भेटीला
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? शरद पवार शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या भेटीला
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : शरद पवार हे महाविकासआघाडीमधीलच आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का देणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलंय शरद पवारांनी घेतलेली उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याची भेट. सोलापूर दौऱ्यामध्ये शरद पवारांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढली होती.
advertisement
मागच्या पाच वर्षांपासून दिलीप सोपल शिवसेना पक्षापासून अलिप्त आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघ महाविकासआघाडीमधील शरद पवारांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिलीप सोपल शरद पवारांच्या पक्षात जायच्या तयारीत आहेत का आणि त्यातूनच ही भेट झाली आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
शरद पवार हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी दिलीप सोपल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दिलीप सोपल अनेक वर्ष शरद पवारांचे सहकारी राहिले आहेत. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप सोपल आणि शरद पवार यांची पहिल्यांदाच बार्शीमध्ये भेट झाली आहे.
advertisement
बार्शी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, 2014 च्या लाटेतही शरद पवारांनी हा गड राखला होता, मात्र आमदार दिलीप सोपल यांनी 2019 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने निरंजन भूमकर यांना बार्शीतून संधी दिली होती. या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? शरद पवार शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या भेटीला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement