advertisement

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती पूर्णत: सुरक्षित, मंदिर समितीचं स्पष्टीकरण; वारकऱ्यांना आवाहन

Last Updated:

श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. मूर्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने कार्यवाही सुरू

News18
News18
पंढपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याची बाब समोर आली होती.  त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने खुलासा करण्यात आला असून श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता आणि दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे.
advertisement
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सन २०२० मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली असून, सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. पण, भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत.
advertisement
भाविकांना आवाहन
यासंदर्भात श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने वारकरी, भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.  श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. मूर्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने कार्यवाही सुरू असून, भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने मूर्तींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पण, मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली असल्याचं यावेळी औसेकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती पूर्णत: सुरक्षित, मंदिर समितीचं स्पष्टीकरण; वारकऱ्यांना आवाहन
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement