Indian Overseas Bank Bharati : इंडियन बँकेमध्ये तरूणांसाठी नोकरीची संधी, मिळणार लाखो रूपये पगार; जाणून घ्या Details

Last Updated:

Indian Overseas Bank Bharati 2025 : इंडियन ओव्हरसीज बँकेने सप्टेंबर 2025 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 171 रिक्त जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती केली जाणार आहे.

Indian Overseas Bank Bharati : इंडियन बँकेमध्ये तरूणांसाठी नोकरीची संधी, मिळणार लाखो रूपये पगार; जाणून घ्या Details
Indian Overseas Bank Bharati : इंडियन बँकेमध्ये तरूणांसाठी नोकरीची संधी, मिळणार लाखो रूपये पगार; जाणून घ्या Details
इंडियन ओव्हरसीज बँकेने सप्टेंबर 2025 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 171 रिक्त जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये भरती केली जाणार आहे. खरंतर ज्या उमेदवारांना बँकेमध्ये आणि फायनान्स क्षेत्रामध्ये करीयर करायचे आहे, अशा तरूणांसाठी फार मोठी संधी आहे. शिवाय, ज्या तरूणांना सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने नोकरीबद्दलची अधिकृत जाहिरात वेबसाईटवर शेअर केली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी कोणकोणत्या पात्रता आहेत, जाणून घेऊया...
सर्वात पहिले इच्छूक उमेदवारांना इंडियन बँकेमध्ये नोकरीसाठी indianbank.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. तर, या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर आहे. इंडियन बँकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. मुख्य बाब म्हणजे, 171 जागांसाठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदाची नोकरभरती केली जाणार आहे. बँकेमध्ये मॅनेजर पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरीसाठी 23 ते 36 वयापर्यंतची वयोमर्यादा आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
advertisement
मुख्यबाब म्हणजे, स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठीची भरती लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होणार आहे. इंडियन बँकेतील नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवाराला भरघोस पगार मिळणार आहे. स्केल II लेव्हलसाठी 64820 ते 93,960 रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी 85920 ते 105280 रुपये पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी 102300 ते 120940 रुपये पगार मिळणार आहे. इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या वेगवेगळ्या पदांसाठी आयटी टेक्नोलॉजी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 4 वर्षांसाठी इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्समध्ये टेक्नोलॉजी डिग्री/ कॉम्प्यटर ॲप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशन डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत इतर पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला अधिसूचनेत देण्यात आली आहे.
advertisement
अधिक सुचनेसाठी इच्छूक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीची PDF एकदा वाचावी. शिवाय, अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला देण्यात येत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indian Overseas Bank Bharati : इंडियन बँकेमध्ये तरूणांसाठी नोकरीची संधी, मिळणार लाखो रूपये पगार; जाणून घ्या Details
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement