Pune: संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकरचा गेम ओव्हर, मोबाइलमध्ये मोठं सिक्रेट, पाकिस्तान कनेक्शन समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यात काही दिवसांपूर्वी संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकर नावाच्या व्यक्तीला तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्याच्या फोनमधून मोठं सिक्रेट पोलिसांच्या हाती लागलं आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यात झुबेर हंगरगेकर नावाच्या व्यक्तीला तपास यंत्रणांनी अटक केली होती. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या कारणावरून ही अटक करण्यात आली होती. राजधानी दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर झुबेर हंगरगेकर याची अटक महत्त्वाची मानली जात होती. त्याचा दिल्ली स्फोटाशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत होते.
आता झुबेरच्या मोबाईल फोनमधून मोठं सिक्रेट तपास यंत्रणांच्या हाती लागलं आहे. संशयित दहशतवादी झुबेरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानसह आखाती देशांमधील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळले आहेत. आता हे नंबर नेमके कुणाचे आहेत? आणि झुबेरच्या फोनमध्ये सेव्ह का आहेत? यावरून तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. या धक्कादायक खुलास्यानंतर जुबेर हंगरगेकर याला आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
advertisement
जुबेर हंगरगेकर याच्याकडून तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या जुन्या आणि सध्या वापरात असलेल्या दोन्ही हँडसेटमध्ये हे आंतरराष्ट्रीय क्रमांक सेव्ह असल्याचे उघड झाले आहे. जुन्या हँडसेटमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एक नंबर पाकिस्तानचा, दोन नंबर सौदी अरेबियाचे, एक नंबर ओमानचा आणि एक नंबर कुवेतचा असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळले आहेत. तर सध्या वापरत असलेल्या मोबाईलमध्ये एक ओमानचा आणि चार सौदी अरेबियाचे नंबर आहेत.
advertisement
हे सर्व आंतरराष्ट्रीय क्रमांक झुबेर हंगरगेकर याच्यासाठी महत्त्वाचे असून यातून त्याचं दहशतवादी कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या नंबरबाबत चौकशी केली असता, ते कोणाचे आहेत किंवा त्यांचा कशाशी संबंध आहे, याबद्दल माहिती नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर हंगरगेकरने दिले आहेत.
एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत असलेला झुबेर हंगरगेकर हा 'अल कायदा'च्या विचारांनी प्रेरित होऊन दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केली होती. त्याच्याकडे अल-कायदा संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय क्रमांकांच्या माध्यमातून त्याचे थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क होते का? याची कसून चौकशी आता तपास यंत्रणा करणार आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकरचा गेम ओव्हर, मोबाइलमध्ये मोठं सिक्रेट, पाकिस्तान कनेक्शन समोर


