Jalna Accident: आता फोटोच शेवटची आठवण, क्षणात कुटुंब उद्ध्वस्त; अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना : राज्यातील रस्ते अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दररोज अपघाताच्या दुर्घटनेत प्रवाशांनी जीव गमावल्याचे वृत्त ऐकायले मिळते. कधी चार चाकी तर कधी दुचाकी वाहनांचे अपघात होतात. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू झाला आहे. कार पलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चुरडा झाला आहे.
संभाजीनगरला राहणारे चव्हाण कुंटुंब हे गावी लातूरला जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात नुरवी चव्हाण ( अडीच वर्षे) आणि रोहिणी चव्हाण ( 30 वर्षे) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
कुटुंब उद्ध्वस्त
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जखमींतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. गाडीचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणामुळे एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
advertisement
उदगीर-नांदेड महामार्गावर कार-टेम्पोचा भीषण अपघात
लातूर जिल्ह्यातील उदगीर नांदेड महामार्गावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. ज्यात कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. सुदैवाने या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नाही. उदगीर येथे रुग्णालयात उपचार घेऊन काही कार मधील प्रवासी हे वाढवणा या आपल्या गावी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोची कारला उदगीर नांदेड रोडवरील गंडी पाटी जवळ समारोसमोर जोरदार धडक बसली. आपली चूक लक्षात येताच आयशर टेम्पोच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 19, 2025 5:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Accident: आता फोटोच शेवटची आठवण, क्षणात कुटुंब उद्ध्वस्त; अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू







