रक्षाबंधनासाठी बहिणीला भेटायला निघाला, वाहनावरील ताबा सुटला, भाऊ बसच्या चाकाखाली, जागीच मृत्यू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalna Road Accident: बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूरमध्ये घडली.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना : रक्षाबंधनाला बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना जिल्ह्यात बदनापूरमध्ये घडली आहे. संजय सुदामराव चंदनपाट असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
करमाड जवळील जडगाव येथील संजय सुदामराव चंदनपाट (वय वर्ष ४८) हे दुचाकीने जालन्याच्या दिशेने जात होते. मात्र त्यांचा वाहनावरचा ताबा सुटून शाळेच्या बस क्रमांक एमएच १४ एमएच १६७९ च्या मागील चाकाखाली ते सापडले. जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूरमध्ये ही घटना घडलीये. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच बहिणीने हंबरडा फोडला. आता भावाला पुन्हा कधीच राखी बांधता येणार नाही, या वास्तवाने बहीण हमसून हमसून रडली. चंदनपाट आणि बहिणीच्या कुटुंबियांच्या घरी संजय यांच्या मृत्यूमुळे सणादिवशी स्मशान शांतता होती.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 11, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रक्षाबंधनासाठी बहिणीला भेटायला निघाला, वाहनावरील ताबा सुटला, भाऊ बसच्या चाकाखाली, जागीच मृत्यू










