advertisement

Jalna Crime: बाळांनो इन्स्टावर मैत्री करू नका, त्याच्यापायी माझं पिल्लू गेलं; माय धाय मोकलून रडली

Last Updated:

तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपींना अटक करून कडक शिक्षा करा, अशी मागणी केली.

News18
News18
Jalna Crime : जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला 11 वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांमुळे 17 वर्षीय मुलीने गळफास लावून जीवनयात्रा संपवली (Jalna Crime) आहे. अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या या तरुणीला आरोपींने इन्स्टाग्रामवर ओळख करून मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपींना अटक करून कडक शिक्षा करा, अशी मागणी केली. तसेच इन्स्टाग्रामला बळी पडी नका, असे आवाहन तरुण-तरूणींना केले आहे.
तरूणीची आई म्हणाली, माझ्या मुलीची काहीच चुकी नव्हती.ती मला सगळ खरं सांगत असे. माझ्या लेकराकडे इन्स्टा आयडी मागितली आणि एक मैत्री केली माझ्या लेकीने त्यात आज तीचा जीव गेला. बाळांनो इन्स्टावर कधीच मैत्री करू नका, माझं जज होणारं पिल्लू होतं.माझे नॅशनल लेव्हलपर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलं आहे. बळी पडू नका. या इन्स्टामुळं माझ्या घराचा एकलुता एक वारस गेला.आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या तरुणाकडे कॉलनीतील 20 ते 25 मुलींची व्हिडीओ मोबाईलमध्ये आहे.
advertisement

तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास

मृत तरुणीची आणि आरोपीची ओळख ही इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर आरोपीने तिचे फोटो वापरले. एवढंच नाहीतर तिला कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून धमकावत होता. या तरुणीने 3 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलं होतं. आत्महत्या केलेली मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. ही मुलगी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता तिने ब्लॅकमेलिंग करून धमकावणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Crime: बाळांनो इन्स्टावर मैत्री करू नका, त्याच्यापायी माझं पिल्लू गेलं; माय धाय मोकलून रडली
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement