advertisement

वर्षभर नीट नांदवलं, नंतर पैशासाठी तगादा, सृष्टीला त्रास नकोसा झाला, अखेर टोकाचं पाऊल उचललं

Last Updated:

Jalna Crime: सृष्टी संकेत मणियार (वय 21 वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. वर्षभरापूर्वी सृष्टीचा विवाह मंठा शहरातील संकेत कैलास मणियार याच्याशी झाला होता.

जालना मंठा नवविवाहितेची आत्महत्या
जालना मंठा नवविवाहितेची आत्महत्या
रवी जैस्वाल, जालना : जालन्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. जालन्याच्या मंठा शहरातील मारवाडी गल्लीत ही घटना घडलीय. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात मयत विवाहितेच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सृष्टी संकेत मणियार (वय 21 वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव आहे. वर्षभरापूर्वी सृष्टीचा विवाह मंठा शहरातील संकेत कैलास मणियार याच्याशी झाला होता. सुरुवातीच्या काही दिवस सासरच्यांनी विवाहितेला चांगले नांदवले. नंतर नवीन व्यवसाय टाकण्याकरिता माहेरून पैसे आण असा तगादा तिच्याकडे लावला.
पैशांसाठी सासरची मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. याच छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
या तक्रारीवरून पोलिसांत मयत विवाहितेच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत कैलास मणियार, कैलास रामेश्वर मणियार, किरण कैलास मणियार आणि अंकिता भुतडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वर्षभर नीट नांदवलं, नंतर पैशासाठी तगादा, सृष्टीला त्रास नकोसा झाला, अखेर टोकाचं पाऊल उचललं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement