Jalna News : ...म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, अखेर वादानंतर DYSPचं स्पष्टीकरण

Last Updated:

जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली होती

jalna news dysp anant kulkarni
jalna news dysp anant kulkarni
Jalna News : जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली होती.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या वादानंतर आता DYSP अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकाने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकल्याने बळाचा वापर केला असल्याचं स्पष्टीकरण DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे. पत्नीने दुसरं लग्न केल्यानं पत्नीला आणून देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
advertisement
इतकं करून देखील आज पंकजा मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गोपाल चौधरीवर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
'हा विकृतीचा कळस'
रोहित पवार यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एकवेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करुनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कंबरेत DYSP अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे,अशी संतप्त टीका त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा, अशी मागणी आता रोहित पवार यांनी केली आहे.
advertisement
स्वातंत्र्यदिनानिमित्त जनतेच्‍या कमरेत लाथा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तवरील पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेऊन निघाले. पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली.
advertisement
एखाद्या चित्रपटात पोलिस जसे उडी मारून लाथ मारतात, तशी Dysp कुलकर्णी यांनी भररस्त्यात लाथ मारली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पोलिस दाखल घेत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली, आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांच्या कमरेत लाथ घातली. त्या पोलिस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता? हे मात्र समजू शकले नाही. तरीही अशी लाथ मारणे चुकीचेच...,असे त्यांनी म्हटले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna News : ...म्हणून आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली, अखेर वादानंतर DYSPचं स्पष्टीकरण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement