advertisement

Jalna News : 'सातबारा कोरा-कोरा, शेतकरी कर्जमाफी हवीच!', बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्याची सरकारला कर्जमाफीची आठवण

Last Updated:

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील सोयंजना गावातील एका शेतकऱ्याने बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्ये लिहून सरकारला कर्जमाफीची आठवन करून दिली आहे.

bail pola 2025
bail pola 2025
Jalna News : राज्यात आज बैलपोळा सण उत्साहात साजरा केला जातो आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. यानिमित्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील सोयंजना गावातील एका शेतकऱ्याने बैलांच्या पाठीवर कर्जमाफीचे घोषवाक्ये लिहून सरकारला कर्जमाफीची आठवन करून दिली आहे.त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बैलजोडीची प्रचंड चर्चा रंगली आहे.
परतूर तालुक्यातील सोयंजना गावातील वैजनाथ ढवळे यांची ही बैलजोड आहे. ढवळे हे स्वत: प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांनी सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवण करून देत अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला आहे.
दरम्यान सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.मात्र सत्तेत आल्यानंतही सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये बैलांच्या पाठीवर लिहून सरकारला कर्जमाफीची आठवन करून दिली आहे.
advertisement
या पोळ्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्याला यश देण्यासाठी आपल्या बैलावर सातबारा कोरा कोरा आणि शेतकरी कर्जमाफी हवीच, हे घोषवाक्य लिहण्याचं आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केलं होतं. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलावर सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशी घोषवाक्ये लिहली आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात 138 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या पदयात्रेला शिवसेना युबीटी आणि मनसेने पाठिंबा जाहीर केला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna News : 'सातबारा कोरा-कोरा, शेतकरी कर्जमाफी हवीच!', बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्याची सरकारला कर्जमाफीची आठवण
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement