advertisement

Street Dogs: मुंबईतील संस्था करतेय जालन्यात काम, मोकाट श्वानांचे होणार रेबीज लसीकरण, असा आहे उपक्रम

Last Updated:

जालना शहरामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे

+
कुत्र्यांचे

कुत्र्यांचे लसीकरण

जालना : जालना शहरामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळेच महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी करावी. तसेच त्यांचे रेबीज लसीकरण करावं यासाठी नागरिक तसेच प्राणी प्रेमी आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील समस्त महाजन संस्थेच्या मदतीने जालना शहरातील तब्बल 4 ते 5 हजार मोकाट श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येत आहे.
advertisement
मोकाट श्वान खायला अन्न न मिळाल्यास तसेच त्यांची छेडछाड केल्यास हिंस्र होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. अनेकदा रस्त्यावरून जात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि वृद्धांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांना खायला मिळेल याची व्यवस्था करणे, उघड्यावर होत असलेली मांस विक्री, तसेच वाढलेली कुत्र्यांची संख्या, यामुळे या घटना वारंवार घडत आहेत.
advertisement
कुत्र्यांची नसबंदी करावी तसेच त्यांचे रेबीज लसीकरण कराव. यासाठी आम्ही वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु महापालिकेकडून म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आम्ही मुंबई येथील समस्त महाजन संस्थेला संपर्क केला व त्यांच्या माध्यमातून शहरातील मोकाट श्वानांच रेबीज लसीकरण सुरू केले आहे.
advertisement
आतापर्यंत 300 श्वानांच लसीकरण करण्यात आल असून शहरातील सर्व 5000 कुत्र्यांना रेबीची लस देण्याचे समस्त महाजन संस्थेचे लक्ष आहे. लस देण्यात आलेल्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये ओळख पटवण्यासाठी एक पट्टा टाकण्यात आला आहे.
तर महापालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. समस्त महाजन संस्थेच्या माध्यमातून कुत्र्यांना एक वेळचा आहार देण्याच देखील नियोजन करण्यात आल्याचे प्राणी मित्र खुशी उगले त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितल.
advertisement
दरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोकाट ्वानांप्रती आपुलकीचा व्यवहार ठेवल्यास ते हिंस्र होणार नाहीत. लहान मुले असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी मोकाट ्वानांची छेड काढू नये, अस आवाहन देखील खुशी उगले यांनी केल आहे.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Street Dogs: मुंबईतील संस्था करतेय जालन्यात काम, मोकाट श्वानांचे होणार रेबीज लसीकरण, असा आहे उपक्रम
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement