शाडू मातीचे बाप्पा बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह; 3 ते 4 महिन्यांतच बक्कळ उत्पन्न!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मूर्तीकारांकडून मिळत असून शाडू मूर्ती निर्मितीचं काम वेगानं सुरू आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते. सुजाण नागरिक या पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य देतात. मात्र बाजारात शाडू मातीच्या मूर्तींची उपलब्धता तुलनेनं कमी असते. हाच विचार करून एका कुटुंबानं या मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला. आज या व्यवसायावर त्यांचं घर उत्तम चाललंय.
जालना शहरातील सुरकुंडे कुटुंब मागील 15 वर्षांपासून मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात आहे. पोळ्यासाठी लागणारे बैल, देवी महालक्ष्मीची मूर्ती, देवी दुर्गेची मूर्ती आणि दिवाळीत लागणाऱ्या पणत्यादेखील ते बनवतात. शाडूच्या मातीपासून मूर्ती निर्मितीसाठी लागणारं कच्च साहित्य ते छत्रपती संभाजीनगरहून आणतात. यातून 3 ते 4 महिन्यांत त्यांना तब्बल 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळतो. शाडूच्या मातीची मूर्ती सुकण्यासाठी वेळ लागत असल्यानं ते मार्च महिन्यापासूनच मूर्ती बनवायला सुरूवात करतात.
advertisement
सध्या या मूर्ती निर्मितीचं काम जोरात सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात रंगकाम केलं जाईल. पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मूर्तीकारांकडून मिळत असून शाडू मूर्ती निर्मितीचं काम वेगानं सुरू आहे. सुरकुंडे कुटुंबही त्यापैकीच एक.
advertisement
'आमचा शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आहे. मागील 15 वर्षांपासून आम्ही मूर्तीनिर्मिती करतो, मागील 10 वर्षांपासून शाडू मातीपासून मूर्ती तयार करतोय. पीओपी पर्यावरणासाठी हानीकारक असतं, त्यामुळे आम्ही शाडू मातीपासून मूर्ती बनवतो. 8 इंचापासून 3 फुटांपर्यंत आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे. किंमत आहे 150 रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत. गणेशोत्सव सुरू होण्याच्या 3 महिने आधीपासूनच मूर्ती तयार करण्याचं काम आम्ही सुरू करतो', असं युवा शिल्पकार करण सुरकुंडे यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 30, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
शाडू मातीचे बाप्पा बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह; 3 ते 4 महिन्यांतच बक्कळ उत्पन्न!