Railway: छत्रपती संभाजीनगर ते जालना, दक्षिण मध्य रेल्वेकडून वेळापत्रकात मोठे बदल, इथे पाहा वेळापत्रक
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर ते गुंटूर एक्सप्रेस ही गाडी जालना येथून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, जालना ते पूर्णा दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.
जालना: दक्षिण मध्य रेल्वेकडून 31 मे ते 20 सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान रेल्वे लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते गुंटूर एक्सप्रेस ही गाडी जालना येथून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, जालना ते पूर्णा दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते गुंटूर ही गाडी जालना येथून सायंकाळी 5 वाजता सुटेल. तसेच, गुंटूर ते छत्रपती संभाजीनगर ही गाडी 19 सप्टेंबरपर्यंत जालना येथेच थांबणार आहे.
advertisement
जालना-पूर्णा दरम्यान विशेष रेल्वे
उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दक्षिण मध्य रेल्वेने जालना-पूर्णा-जालना मार्गावर साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अनारक्षित असेल आणि दर रविवारी जालना ते पूर्णा मार्गावर धावेल. ही गाडी 1 जून ते 27 जुलै या कालावधीत दर रविवारी सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे जालना येथे रात्री 8:50 वाजता पोहोचेल. तसेच, जालना ते पूर्णा दरम्यान दर गुरुवारी ही गाडी सोडण्यात येईल.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
May 30, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/जालना/
Railway: छत्रपती संभाजीनगर ते जालना, दक्षिण मध्य रेल्वेकडून वेळापत्रकात मोठे बदल, इथे पाहा वेळापत्रक








