Marathwada Weather : मराठवाड्यात पहिल्यांदाच पडली बर्फासारखी थंडी? असं का घडलं? शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट

Last Updated:

राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असून तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली कोसळले आहे.

+
News18

News18

जालना : राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असून तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली कोसळले आहे. मराठवाड्यामधील थंडीची असलेली लाट ही सामान्य आहे की असामान्य? या थंडीचा रब्बी पिकांवर कसा परिणाम होऊ शकतो? तसेच सर्वसामान्यांनी या दिवसांत काय काळजी घ्यावी? याबद्दल कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना येथील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिली.
मराठवाड्यात पडत असलेली थंडी ही सामान्य आहे आणि आपल्या उपयोगाची आहे. यंदा पाऊस लांबला आणि नंतर उशिरा थंडीला सुरुवात झाली. परंतु नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण भारतात निवार नावाचे वादळ आले. या वादळाचा प्रभाव कन्याकुमारी, तामिळनाडू, श्रीलंका, पुद्दुचेरी आणि आंध्रप्रदेश असे सरकत पुढे गेले.
advertisement
यामुळे चार ते पाच दिवस काहीशी थंडी कमी झाली होती. वादळ पुढे सरकताच पुन्हा उत्तरेकडून वारे यायला लागले आणि थंडी वाढण्यास सुरुवात झाली. तापमान अगदीच 5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालं तर आपण त्याला असामान्य म्हणू शकतो. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. पुढील तीन आठवडे राज्यात थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू थंडी कमी होईल, असं पंडित वासरे यांनी सांगितलं.
advertisement
या उलट ही थंडी रब्बी पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गहू, हरभरा, तूर यांसारखी पिके या थंडीच्या काळात चांगली येऊ शकतात. तसेच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव देखील होत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी देखील या थंडीचा आनंद घ्यावा. फक्त लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. त्यांना उबदार कपडे परिधान करण्यास सांगावे. तसेच उघड्यावर झोपू नये.
advertisement
सकाळी आणि सायंकाळी कामकाजावर काही प्रमाणात थंडीमुळे परिणाम होत असला तरी ही थंडी आरोग्याला आणि पिकांना देखील मानवणारी आहे. त्यामुळे यामध्ये असामान्य असं काही नसल्याचंही पंडित वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Marathwada Weather : मराठवाड्यात पहिल्यांदाच पडली बर्फासारखी थंडी? असं का घडलं? शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement