विळा दे म्हणाला अन् थेट घरात घुसला, जालन्यात शाळकरी मुलीसोबत विकृतीचा कळस
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३२ वर्षीय नराधमाने १३ वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३२ वर्षीय नराधमाने १३ वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. आरोपीनं पीडित मुलगी घरी एकटी असल्याचं पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गोंदी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हनुमान बाबुराव गिरी असं अटक केलेल्या ३२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावात घडली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही बाब नराधम गिरीच्या लक्षात आली. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी हनुमान गिरी पीडितेच्या घरी गेला. त्याने पीडितेकडं विळा मागण्याचा बहाणा गेला. पीडित मुलगी विळा आणण्यासाठी घरात गेली असता, आरोपीही तिच्यापाठोपाठ घरात घुसला. यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर, पीडितेच्या कुटुंबीयांनी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपी हनुमान गिरीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 07, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
विळा दे म्हणाला अन् थेट घरात घुसला, जालन्यात शाळकरी मुलीसोबत विकृतीचा कळस







