परिस्थितीनं बनवलं भिकारी, पण जिद्दीनं बनला निराधारांचा आधार, काम पाहून कराल सलाम, Video

Last Updated:

जालन्यात कधीकाळी भिक मागून जगणाऱ्या तरुणानं अनेकांना मदतीचा हात दिलाय.

+
परिस्थितीनं

परिस्थितीनं बनवलं भिकारी, पण जिद्दीनं बनला निराधारांचा आधार, काम पाहून कराल सलाम, Video

जालना, 9 डिसेंबर: प्रत्येक शहरामध्ये आपल्याला मनोरुग्ण, भिक मागणारे तसेच अन्न पाण्याची सोय नसलेले, निवारा नसलेले अनेक लोक आढळून येतात. अशा लोकांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. मात्र जालना शहरातील सागर डुकरे नावाचा तरुण मागील आठ वर्षांपासून अशा लोकांची सेवा करतोय. आतापर्यंत 147 लोकांना मदतीचा हात सागरने पोहोचवला आहे. तर आठ लोकांना पूर्णपणे रिकव्हर करण्यात त्याला यश आलंय. कधीकाळी स्वतः बस स्थानकावर भीक मागणारा सागर आज तीच वेदना जाणून निराधारांचा आधार बनला आहे.
कोण आहे सागर डुकरे?
केवळ सातवीपर्यंत शिक्षण झालेला सागर डुकरे हा जाफराबाद तालुक्यातील किनी या गावचा रहिवाशी आहे. घरी अठरा विश्व दारिद्र्य. वडील दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने आईने जमेल तसा त्यांचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न केला. 2007 मध्ये सागरच्या वडिलांचा निधन झालं आणि त्याचा आधार पूर्णपणे हरपला. मग तो जालना शहरांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आला. मात्र वय लहान असल्याने कोणीही काम देत नव्हते. त्यामुळे जालना शहरातील बस स्थानकावर भीक मागून स्वतःची गुजारण करण्यास सुरुवात केली.
advertisement
गुन्हेगारी क्षेत्र सोडलं
काही दिवसांनी एका व्यवसायिकानं त्याला काम दिलं. काही दिवस पान टपरीचा व्यवसाय देखील केला. चुकीच्या लोकांची संगत लागल्याने गुन्हेगारी क्षेत्राकडे देखील त्याची पावले वळू लागली. मात्र आपण हे काय करतो याचा त्यालाच पश्चाताप झाल्याने त्याने गुन्हेगारी क्षेत्र सोडलं, असं सागर सांगतो.
advertisement
निराधारांना आधार
2015 पासून सागर सातत्याने शहरातील निराधार व्यक्तींना शक्य होईल तेवढी मदत देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 147 लोकांना मदतीचा हात त्यानं दिलाय. तर आठ लोकांना पूर्णपणे रिकव्हर करण्यात त्याला यश आलंय. मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी त्याने एक हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून ज्याला कुणाला मदतीची आवश्यकता असेल तो मदत मिळवू शकतो, असे सागर सांगतो.
advertisement
आठ वर्षांपासून करतोय सेवा
मी स्वतः बस स्टँडवर भीक मागून स्वतःचं पोट भरलं आहे. त्यामुळे सध्या या स्थितीत असलेल्या लोकांची मला प्रचंड दया येते. मागील आठ वर्षांपासून मी या लोकांना होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. या कामात मी एकटाच नसून माझ्या पाठीमागे 40 लोकांची टीम आहे. आम्ही अशा लोकांना सगळ्यात आधी क्लीन करतो आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात त्यांची सोय करतो. पुढे अनेक जण ठीक झाल्यानंतर पळून जातात. मात्र काही लोक पूर्णपणे रिकव्हर होईपर्यंत थांबतात, असे सागर डुकरे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
परिस्थितीनं बनवलं भिकारी, पण जिद्दीनं बनला निराधारांचा आधार, काम पाहून कराल सलाम, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement