रद्दीत जाणाऱ्या वह्यांच्या पानांचा असाही पुनर्वापर, शिक्षकाने तयार केले घरीच नोटपॅड

Last Updated:

जालना शहरातील 100 क्लब शिक्षक या ग्रुपने 'कागद वाचवा झाडे वाचवा' या उपक्रमांतर्गत उरलेल्या कोऱ्यापानांपासून नोटपॅड तयार करण्याचा सृजनशील उपक्रम सुरू केला आहे. शिक्षक राजेभाऊ मगर यांनी तब्बल 500 नोटपॅड घरीच तयार केले आहेत. 

+
News18

News18

नारायण काळे,प्रतिनिधी 
जालना : उन्हाळी सुट्ट्या संपून लवकरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी आपल्या जुन्या वह्या रद्दीमध्ये घालतात. या वह्यांमध्ये काही प्रमाणात लिखाण झालेली कोरी पानेही असतात. ही पाने देखील अर्ध्या बरोबर वाया जातात. हीच बाब लक्षात घेऊन जालना शहरातील 100 क्लब शिक्षक या ग्रुपने 'कागद वाचवा झाडे वाचवा' या उपक्रमांतर्गत उरलेल्या कोऱ्यापानांपासून नोटपॅड तयार करण्याचा सृजनशील उपक्रम सुरू केला आहे. शिक्षक राजेभाऊ मगर यांनी तब्बल 500 नोटपॅड घरीच तयार केले आहेत.
advertisement
कसे केले पाने गोळा? 
100 क्लब शिक्षक ऑफ जालना या शिक्षक समूहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी 'कागद वाचवा झाडे वाचवा' या उपक्रमांतर्गत ज्या वह्या पालक, विद्यार्थी विकतात त्या आम्ही गोळा करण्याचे काम करतो. रद्दीमध्ये विकल्या जाणाऱ्या वह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कोरे पाने असतात. ही कोरे पाने रद्दीमध्ये विकल्या जातात आणि म्हणून कुठेतरी पर्यावरण संवर्धनासाठी काम करत असताना इकडे रद्दीत वाया जाणारे पाने बघून मन विचलित झालं. आपण कुठेतरी या रद्दीमध्ये जाणाऱ्या कोऱ्यापानांचा पुनर्वापर आपल्याला करता येईल का? या अनुषंगाने विचार केला. मग हे आव्हान समोर घेऊन आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना भेटलो आणि त्यांच्याकडे ज्या काही वर्ष समाप्तीनंतर वह्या आहेत. त्या वह्यामध्ये त्यांच्याकडे कोरे पान असतील चार, दहा, पाच, वीस, पंचवीस असे सगळे कोरे पान जमा केले, असं शिक्षक राजेभाऊ मगर सांगतात.
advertisement
कसा तयार केला जातो नोटपॅड? 
उरलेल्या कोऱ्यापानांपासून नोटपॅड तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दहा कोरी पाने घ्यायची. ती कोरी पाने नोटपॅडच्या आकाराची व्यवस्थित कटरने कट करून घ्यायचे आहेत. यानंतर त्यांची व्यवस्थित सेटिंग करून स्टेपलरने त्याला दोन व्यवस्थित स्टेपल करून घ्यायचं. यानंतर हे का रंगीत पानाला फेविकॉलच्या साह्याने व्यवस्थित चिपकून घ्यायचे अशा पद्धतीने आपला नोटपॅड पॅड तयार होतो, असं शिक्षक राजेभाऊ मगर सांगतात.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
रद्दीत जाणाऱ्या वह्यांच्या पानांचा असाही पुनर्वापर, शिक्षकाने तयार केले घरीच नोटपॅड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement