Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीर देखील ताब्यात घ्यावे, ऑपरेशन सिंदूरनंतर जालनाकर काय म्हणाले?

Last Updated:

आज सकाळी दीड वाजेच्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी तळावर हवाई हल्ले करून या क्रूर दहशतवादी कृत्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. 

+
News18

News18

जालना : 22 एप्रिल रोजी जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारवर दबाव होता. आज सकाळी दीड वाजेच्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी तळावर हवाई हल्ले करून या क्रूर दहशतवादी कृत्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. याबद्दलच जालना शहरातील नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकल 18 च्या प्रतिनिधीने केला पाहुयात.
भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना जे प्रत्युत्तर दिले त्याचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो. आज पर्यंत जे झालं ते झालं परंतु आता हे नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. लोकांना ज्या पद्धतीने ठार केले जाते त्याचं कठोर प्रतिउत्तर देणारे हे सरकार आहे त्यामुळे मी सरकार आणि भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे स्वागत करतो, असं गणेश चौधरी यांनी सांगितलं.
advertisement
पाकिस्तानवर भारतीय सैन्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास केलेल्या हल्ल्याची बातमी टीव्हीवर सकाळी पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येणार नाही. सरकारने पंधरा दिवसानंतर का होईना पण झालेल्या प्रकाराचा बदला घेतला याचा आनंद असल्याचं अशोक नागरे यांनी सांगितलं.
advertisement
भारताने हे जे प्रतिउत्तर दिल ते अभिनंदन करणे योग्य आहे. यापुढेही भारत सरकार आणि सेना जो काही निर्णय घेईल त्याला आपण भारतीय म्हणून समर्थन दिले पाहिजे. लवकरात लवकर भारताने पाकव्याप्त कश्मीर देखील ताब्यात घ्यावं. जेणेकरून भारतामध्ये तहशतवाद वाढणार नाही, असं भरत वायाळ यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीर देखील ताब्यात घ्यावे, ऑपरेशन सिंदूरनंतर जालनाकर काय म्हणाले?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement