पारंपारिक फडे निर्मिती करणार थोरात कुटूंब, ग्रामीण भागात फड्याना मोठी मागणी, महिन्याला 50 हजार कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
ग्रामीण भागामध्ये आजही फड्याचा वापर सर्रासपणे केला जातो. जालन्यातील थोरात कुटुंबपिढ्यान् पिढ्यापासून फडा निर्मितीचा व्यवसाय करत आहे.
जालना: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जुन्या वस्तू मागे पडत चालल्यात. वरवंट असेल किंवा घरामध्ये घर स्वच्छ ठेवण्यासाठी असलेला फडा. परंतु, ग्रामीण भागामध्ये आजही फड्याचा वापर सर्रासपणे केला जातो. जालन्यातील थोरात कुटुंबपिढ्यान् पिढ्यापासून फडा निर्मितीचा व्यवसाय करत आहे. इंदूर येथून सिंधीची पाने मागवली जातात तर हातावर या फड्यांची निर्मिती केली जाते. ग्रामीण भागातील बाजारामध्ये या फड्यांना मोठी मागणी असते. महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये थोरात कुटुंब फडा निर्मितीच्या व्यवसायातून कमवत आहे.
जुन्या काळात दररोजच्या वापरात असलेल्या अनेक पारंपारिक वस्तू आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पारंपारिक वस्तू तयार करण्यासाठी कारागीरच न उरल्याने अनेक व्यवसाय देखील अखेरचे घटका मोजत आहेत. परंतु, काही जुन्या जाणत्या कारागिरांनी काही व्यवसाय जिवंत ठेवलेत. त्यापैकीच एक म्हणजे फडा निर्मितीचा हा व्यवसाय. थोरात कुटुंब जालन्यातील सोलगव्हाण येथे मागील अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करत आहे.
advertisement
पूर्वी गावातीलच सिंधीच्या झाडांची पाने गोळा करून फड्यांची निर्मिती केली जायची. परंतु, आता सिंधीची झाडेच मोजकीच उरल्याने बाहेरून कच्चामाल मागवला जातो. दिवसभरात वीस ते पंचवीस फड्यांची निर्मिती केली जाते. या फड्यांना बाजारात 50 ते 60 रुपये प्रति नग असा दर मिळतो. मंठा येथील व्यापारी थोरात कुटुंबाकडील फडे घरपोच घेऊन जातो. महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपये हे कुटुंब या पारंपारिक व्यवसायाच्या माध्यमातून कमवत आहे. कुटुंबाच्या उपजीविकेबरोबरच पारंपारिक व्यवसायाला जिवंत ठेवण्याचे काम देखील या कुटुंबाकडून होत आहे.
advertisement
50 पैशांना एक फडा होता तेव्हापासून आम्ही फडा निर्मितीचा व्यवसाय करतो. सिंधीच्या पानांना वाळू घालावे, त्यांना जोडणे, त्यानंतर पन्हाळ्या काढणे, पड बनवणे, पड बनवल्यावर जुड्या धरणे, त्यानंतर त्यांना बांधणे आणि शेवटी फड्याला विंचरणे अशा पद्धतीने फडा तयार करणे हे एक किचकट काम असल्याचे भागुबाई थोरात यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jun 03, 2025 11:36 PM IST
मराठी बातम्या/जालना/
पारंपारिक फडे निर्मिती करणार थोरात कुटूंब, ग्रामीण भागात फड्याना मोठी मागणी, महिन्याला 50 हजार कमाई






