Traffic Jam: वाहतूक कोंडी सुटणार, जालन्यात पहिल्यांदाच सुरू झालाय नाविन्यपूर्ण उपक्रम, असा होणार फायदा, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जालना शहरात देखील मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न बनलाय. यावरच उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी मिळून ट्रॅफिक वॉर्डन हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
जालना : हल्ली प्रत्येक शहरामध्ये वाहतुकीची समस्या पाहायला मिळते. अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण असल्याचे पाहायला मिळतंय. जालना शहरात देखील मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न बनलाय. शहरातील अनेक चौकांमध्ये वाहनधारकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावा लागतो. यावरच उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी मिळून ट्रॅफिक वॉर्डन हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. पाहुयात काय आहे हा उपक्रम.
शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवणे, रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या फेरीवाल्यांना त्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगणे. याचबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांनी मिळून शहरामध्ये तब्बल आठ ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची योजना आखली आहे.
advertisement
या अंतर्गत होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या तरुणांना व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वर्गणीतून पगार देण्यात येणार आहे. हे ट्रॅफिक वॉर्डन शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये थांबून वाहतुकीचे नियमन करणार आहेत.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी पाहता हा नावीन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि व्यापारी यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. सध्या आठ ट्रॅफिक वॉर्डन कार्यरत असून भविष्यात यांची संख्या 25 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. शहरातील नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सदर बाजार स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी लोकल 18 शी बोलताना केले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jun 02, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/जालना/
Traffic Jam: वाहतूक कोंडी सुटणार, जालन्यात पहिल्यांदाच सुरू झालाय नाविन्यपूर्ण उपक्रम, असा होणार फायदा, Video







