जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना जिल्ह्यातील मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग हे चक्क मंगल कार्यालयात भरवण्याची वेळ आली आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : पायाभूत शिक्षण हा देशाच्या विकासाचा पाया असतो. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होणं, अत्यंत गरजेचं असतं. यासाठी शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा आणि उच्चविभूषित शिक्षक वर्ग असावा लागतो. सरकारी शाळांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग हे चक्क मंगल कार्यालयात भरवण्याची वेळ आली आहे. शाळेसाठी निधीच उपलब्ध नसल्याने पहिली ती आठवीपर्यंत असलेल्या या शाळेतील काही वर्ग वधूच्या खोलीत आणि काही वर्ग वराच्या खोलीत, तर उरलेले काही वर्ग ओपन स्पेस मध्ये हॉलमध्ये भरवले जातात. त्यामुळे ही शाळा नेमकी कशी आहे आणि विद्यार्थ्यांना या शाळेत शिकताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबाबत लोकल18 च्या टिमने एक विशेष आढावा घेतला.
advertisement
जालना शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या तर अनेक शाळांना पक्क्या अशा इमारती नाही आहेत. शहरातील शकुंतला नगर येथे तर चक्क मंगल कार्यालयात शाळा भरवण्याची वेळ येथील शिक्षक व मुख्याध्यापकांवर आली आहे. पहिली ती आठवीपर्यंत असलेल्या या शाळेतील प्रत्येक वर्ग मंगल कार्यालयातील वेगवेगळ्या ठिकाणी भरतो. चौथीचा वर्ग स्टेजवर तर पाचवीचा वर्ग वराच्या खोलीत तर सहावीचा वर्ग वधूच्या खोलीत तर सातवीचा वर्ग हॉलमध्ये तसेच आठवीचा वर्ग हा वऱ्हाड थांबण्याच्या खोलीत भरतो. अशा पद्धतीने या शाळेची रचना आहे.
advertisement
मुख्याध्यापक काय म्हणाले -
मनपाच्या अनेक शाळा विद्यार्थी संख्या अभावी बंद पडत आहेत. आमची शाळादेखील काही वर्षांपूर्वी बंद पडली होती. आम्ही सर्वे करून शंभरच्या आसपास विद्यार्थ्यांना जमा करून ही शाळा सुरू केली. सुरुवातीला आमच्या राहत्या घरातच शाळा भरवली. मात्र, कोविड आल्यानंतर घरामध्ये शाळा भरवणं शक्य नव्हतं. त्यानंतर आम्हाला हे मंगल कार्यालय शाळेसाठी उपलब्ध झालं. याचं भाडंदेखील आतापर्यंत देण्यात आलेलं नाही.
advertisement
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
शाळेमध्ये शिकवत असताना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अनंत अडचणी येतात. शिक्षक काय शिकवतात हे विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर सुसज्ज अशी शाळेची इमारत बांधून द्यावी, अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक सतीश खरटमल यांनी केली आहे.
advertisement
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
मनपाचे अधिकारी काय म्हणाले -
विद्यार्थ्यांच्या शाळा शाळेचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध असून निधी अभावी एवढे दिवस शाळा होऊ शकली नाही आता 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या परिसरात असलेल्या ओपन स्पेस वर शाळा उभारण्यात असल्याचं मनपा सह आयुक्त केशव कारपुडे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 25, 2024 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर...