Road Safety Week: जालन्याचा सायकल मॅन,10 वर्षांपासून फक्त सायकलने प्रवास, कारणही खास

Last Updated:

स्त्यावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रस्त्यावरील अपघात कमी व्हावे तसेच पर्यावरणाची हानी टाळावी यासाठी ते मागील 10 वर्षांपासून केवळ सायकलने प्रवास करतात.

+
Vilas

Vilas bodhale 

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा आठवडा देशभर साजरा केला जात आहे. या आठवडाभरात रस्त्यावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी जनजागृती विविध माध्यमातून केली जात आहे. आपला देश विकसित होत असताना वाहनांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे रस्त्यावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अनेक जण विविध माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करत असतात. त्यापैकीच एक आहेत जालन्यातील विलास बोधले. रस्त्यावरील अपघात कमी व्हावे तसेच पर्यावरणाची हानी टाळावी यासाठी ते मागील 10 वर्षांपासून केवळ सायकलने प्रवास करतात.
advertisement
जालना शहरातील जे ई एस महाविद्यालयात लॅब अटेंडन्स या पदावर कार्यरत असलेले विलास बोधले मागील 10 वर्षांपासून सायकलचाच वापर करतात. चार चाकी गाडी घेण्याची आर्थिक क्षमता असतानाही ते केवळ शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरणाची हानी टाळावी, इंधनाची बचत व्हावी, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सायकलचा वापर करत आहेत. त्याचबरोबर आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना देखील सायकल चालवण्यासाठी आणि सायकलचा वापर वाढवण्यासाठी प्रेरित करत आहेत.
advertisement
आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही सायकल चालवत असल्याने अनेक मित्रमंडळी त्यांना याबाबत विचारतात तेव्हा ते सायकल चालवण्याची विविध फायदे त्यांना समजावून सांगतात. यामुळे आणखी अनेक मित्र सायकल चालवण्याबाबत सकारात्मक होतात आणि सायकल चालवण्यास सुरुवातही करतात.
मी मागील 8 ते 10 वर्षांपासून नियमितपणे सायकल चालवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपण मुद्दामून व्यायाम करण्यास कंटाळा करतो. त्यामुळे नियमित सायकल आपल्या दररोजच्या कामासाठी वापरल्यास आपली कामे ही मोफत होतात आणि आपला व्यायाम देखील होतो, शरीर तंदुरुस्त राहते. इंधनाची बचत होते. त्याचबरोबर पैशांची बचत होते, पर्यावरणाची हानी थांबते आणि रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी किमान आठवड्यातून एकदा तरी सायकल चालवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन विलास बोधले यांनी केले.
advertisement
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH #NitinGadkari
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Road Safety Week: जालन्याचा सायकल मॅन,10 वर्षांपासून फक्त सायकलने प्रवास, कारणही खास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement