advertisement

Local Body Election Jayant Patil: जयंत पाटलांनी पत्ता उघडला, बालेकिल्ल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला जाहीर

Last Updated:

Raigad Local Body Election Jayant Patil: अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील समीकरणानुसार, युती-आघाडी होणार असल्याची चिन्हे आहेत. आता, जयंत पाटील यांनी आपला पत्ता उघडला असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे.

जयंत पाटलांनी पत्ता उघडला, बालेकिल्ल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला जाहीर
जयंत पाटलांनी पत्ता उघडला, बालेकिल्ल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला जाहीर
मोहन जाधव, प्रतिनिधी, अलिबाग-रायगड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील समीकरणानुसार, युती-आघाडी होणार असल्याची चिन्हे आहेत. आता, जयंत पाटील यांनी आपला पत्ता उघडला असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. रायगडमधील अलिबाग नगरपालिकेसाठी जयंत पाटलांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेत यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ अलिबाग नगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) एकछत्र वर्चस्व राहिले आहे. यंदाही शेकापच बाजी मारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
शेकापने शेवटी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही घोषणा पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी अधिकृतपणे केली. अलिबाग नगरपालिकेत शेकापचे मजबूत संघटन आहे. स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि मागील कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख करत अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
advertisement

शिंदे गटाविरोधात थेट लढत?

अलिबागमध्ये शेकाप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शिवसेना (शिंदे गट)कडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी लवकरच अधिकृत नाव जाहीर होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत कोणती महिला उमेदवार विरोधक म्हणून उभी राहते, याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.
advertisement

महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार...

यावेळी जयंत पाटील यांनी “अलिबागमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही लढाई लढत आहोत,” असे स्पष्ट केले आहे. अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शेकापसह महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे शेकापकडून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना जागावाटपात किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election Jayant Patil: जयंत पाटलांनी पत्ता उघडला, बालेकिल्ल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला जाहीर
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement