Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी मालवणला आणलं, Exclusive Video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे, त्याला आज मालवण पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग, विशाल रेवडेकर, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला जयदीप आपटे अखेर सापडला आहे. कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी अटक केली आहे. कुटुंबीयांना भेटायला आलेला असताना जयदीप आपटेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान आज जयदीप आपटेला घेऊन पोलीस मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
कल्याणमधून जयदीप आपटे याला घेऊन सिंधुदुर्ग पोलीस मालवण पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. तब्बल अकरा तासाचा प्रवास करून आरोपीसह पोलीस मालवणमध्ये दाखल झाले आहेत. वेळेत दाखल झाल्याने काही वेळातच जयदीप आपटे याला आजच न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे, त्याला आज मालवण पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे. pic.twitter.com/IL4SERHZZ3
— News18Lokmat (@News18lokmat) September 5, 2024
advertisement
मूर्तिकार जायदीप आपटे याच्यावर भारतीय न्याय संहिता 109, 110, 125, 318, 3(5),3 नुसार मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपटे फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आलं आहे. जयदीप आपटे याला थोड्याच वेळात मालवण न्यायलयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी पोलीस आपटेला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयात करण्याची शक्यता आहे.
advertisement
सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे पुतळा कोसळण्याच्या दिवसापासून फरार झाला होता. यानंतर त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
September 05, 2024 11:59 AM IST


