Jaikumar Gore : जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? CM फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती

Last Updated:

Jaykumar Gore : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे आरोप प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे.

News18
News18
मुंबई : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे आरोप प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या आरोपींचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी फोन कॉल केले असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले असून यात सगळे लोक शरद पवार गटाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना हा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस यांनी म्हटले की, आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले आहेत. यात सगळे लोक शरद पवार गटाचे लोक आहेत. प्रभाकरराव देशमुख, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स आहेत. त्यांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना कॉल केले आहेत आणि नंतर त्याने व्हिडिओ करून यांना पाठविले आहेत. या सर्वांची चौकशी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
advertisement

सापळा रचला, सगळा कट उघडकीस आला...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जयकुमार गोरेंबाबत घडलेली घटना महत्त्वाची आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे राजकारण योग्य नाही. 2017 साली ही घटना घडली. त्यावेळी ते आमच्यासोबत नव्हते. दोषी आहेत की नाही, यापेक्षा समाजात अपमान नको म्हणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न असतो. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अनेक संवाद टेप केलेले आहेत. हा ब्लॅकमेलिंग चा प्रकार होता. त्याला हवा देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या. हे सगळं नेक्सस होते. तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्युबर आहे. जयकुमार गोरेंनी पहिली तक्रार केली. विराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली आणि त्यानंतर तिसरी उमेश मोहिते यांनी तक्रार केली. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला.
advertisement

सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे आरोपींना फोन...

या प्रकरणी एक चौथी एक तक्रार झाली. त्यातील तीन लोकांना अटक झाली. पहिली महिला, दुसरा रिपोर्टर आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी रचलेला कट उघड झाला आहे. व्हॉट्स अॅप मेसेज समोर आले आहेत. शेकडो फोन सापडले आहेत. या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सापडले असून आपण हे पुराव्यानिशी सांगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हे तिन्ही आरोपींसोबत बोलले असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे कॉल तुषार खरातला गेले आहेत. ते व्हिडिओ केल्यानंतर या नंबरवर पाठवण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jaikumar Gore : जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? CM फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement