स्कूल ट्रीपला गेलेल्या कल्याणच्या श्वेता मॅडम आता कधीच परतणार नाहीत, परदेशात घडला अनर्थ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Kalyan News: विद्यार्थ्यांची सहल घेऊन इंडोनेशियातील बाली इथं गेलेल्या शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
कल्याण: विद्यार्थ्यांची सहल घेऊन इंडोनेशियातील बाली इथं गेलेल्या शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्वेता पाठक असं मयत शिक्षकेचं नाव आहे. त्या कल्याण येथील बिर्ला स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेतल्या १८ विद्यार्थ्यांना घेऊन इंडोनेशियातील बाली इथं गेल्या होत्या. पण बाली इथं रिव्हर राफ्टींग करताना त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
श्वेता मॅडमच्या मृत्यूची माहिती मिळताच पाठक कुटुंबीयांसह शाळेला धक्का बसला आहे. विद्यार्थी वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ९ मेला श्वेता पाठक काही विद्यार्थ्यांसह बालीमध्ये रिव्हर राफ्टींगचा आनंद घेत होत्या. यावेळी अचानक त्यांची बोट पलटली. रिव्हर राफ्टींग करत असताना श्वेता यांनी लाईफ जॅकेट परिधान केलं नव्हतं. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने श्वेता यांना स्वत:ला वाचवता आलं नाही. दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा बुडून मृत्यू झाला.
advertisement
बिर्ला स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना जांगरा आणि पाठक यांचे पती सध्या बाली येथे आहेत. ते श्वेता यांचा मृतदेह मायदेशी आणण्याची व्यवस्था करत आहेत. या प्रकरणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये, पाठक यांचे पार्थिव इंडोनेशियाहून भारतात नेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि इंडोनेशिया येथील भारतीय दूतावासाकडून मदत मागितली.
advertisement
या दुर्घटनेनंतर शाळेने एक निवेदन जारी केलं. ज्यात त्यांनी श्वेता पाठक यांचं वर्णन विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका आणि मार्गदर्शक होत्या, असा उल्लेख केला. तसेच शाळेने जनतेला श्वेता पाठक यांच्या कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचे आणि खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
May 12, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्कूल ट्रीपला गेलेल्या कल्याणच्या श्वेता मॅडम आता कधीच परतणार नाहीत, परदेशात घडला अनर्थ


