कल्याणमध्ये जिम मालकाचा तरुणीवर अत्याचार, अश्लील फोटो काढत केलं ब्लॅकमेल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कल्याण पश्चिमेकडील एका जिमच्या मालकानं जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर त्याने...
कल्याण पश्चिमेकडील एका जिमच्या मालकानं जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष वारंवार अत्याचार केला. एवढंच नव्हे तर आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं. अखेर पीडित तरुणीने हिंमत दाखवत काही दिवसांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दीड महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत.
खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील रहिवासी असलेली ही तरुणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी शहरातील एका प्रसिद्ध जिममध्ये व्यायामासाठी जात होती. याच दरम्यान, तिची ओळख त्या जिमच्या मालकासोबत झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि याचा गैरफायदा घेत जिम मालकाने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं.
लग्नाचं आमिष दाखवून त्याने तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केले. कालांतराने, या अत्याचाराचं प्रमाण वाढलं, शिवाय आरोपीने दिलेल्या धमक्यांमुळे तरुणी मानसिकदृष्ट्या खचून गेली. हे सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडित तरुणीने सुमारे दीड महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
advertisement
आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आरोपी तत्काळ शहरातून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. सोमवारी आरोपी कल्याणमधील फडके मैदान भागात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
अटक केल्यानंतर आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या आरोपीने इतर कोणत्याही महिलांवर अशाप्रकारे अत्याचार केले आहेत का, या दृष्टीने कसून तपास करत आहेत.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 04, 2025 9:15 AM IST









