Kalyan News : नदीवर कपडे धुवायला गेल्या त्या परतल्याच नाही, दोन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?

Last Updated:

कल्याणमधून एक धक्कादायत घटना समोर आली आहे.या घटनेत काळु नदीवर कपडे धुवायला गेलेल्या दोन बहि‍णींचा पाण्याचा अंदान न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

kalyan news
kalyan news
Kalyan News : कल्याणमधून एक धक्कादायत घटना समोर आली आहे.या घटनेत काळु नदीवर कपडे धुवायला गेलेल्या दोन बहि‍णींचा पाण्याचा अंदान न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अलिया अन्सारी (वय 18) आणि सना अन्सारी (वय 8) अशा या दोघींची नावे आहेत.या घटनेने अन्सारी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आणि परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टिटवाळाजवळ काळू नदीवर दोन बहिणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीच्या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. अलिया अन्सारी (वय 18) आणि सना अन्सारी (वय 8) अशा या दोघी बहि‍णींचा नावे आहेत.त्या मांडा टिटवाळा परिसरातील वासुंद्री रोड नजीक गणेशनगरात राहत होत्या.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली.अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीने नदीपात्रात दोघा बहिणींच्या मृतदेहाचा शोध सुरु केला. अथक प्रयत्नानंतर अलिया हिचा मृतदेह हाती लागला, तर सना हिचा मृतदेहाचा शोध अद्याप सुरु आहे.या घटनेने अन्सारी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि परिसरात शोक व्यक्त होत आहे.

डोंबिवलीत वृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू

advertisement
डोंबिवली पूर्वेतील छेडा रोडवर एका 75 वर्षीय महिलेला पालिकेच्या विद्युत कंत्राट गाडीने चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तृप्ती म्हसकर (वय 75) असे मृत महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला तब्बल दीड तास उलटू देखील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतरम माध्यमांनी फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले होते.
advertisement
डोंबिवली पूर्वेतील छेडा रोड परिसरात सायंकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पथदिवे दुरुस्तीचे काम एस. एस. इलेक्ट्रिक कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीची पथदिवे दुरुस्ती करणारी गाडी या रस्त्याने जात असताना समोर चालणाऱ्या वृद्ध महिलेला गाडीने ठोकल्याची घटना घडली होती.यावेळी गाडीच्या समोरच्या चाकाखाली महिला आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची बाब झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan News : नदीवर कपडे धुवायला गेल्या त्या परतल्याच नाही, दोन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement