बुलढाण्यात जनावरे खरेदी विक्रीवर खाटिक बांधवांचा बहिष्कार, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

Last Updated:

Buldhana News: जिल्ह्यात बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करणार नाही असा निर्णय बुलडाणा येथील आयोजित बैठकीत खाटिक समाजाने घेतला आहे.

जनावरांचा खरेदी विक्री बाजार
जनावरांचा खरेदी विक्री बाजार
राहुल खंडारे, बुलढाणा : मुस्लिम कुरेशी खाटिक बांधवांनी जनावरांच्या कायदेशीर व्यापारात होणाऱ्या त्रासाला कंटाळून जनावरे खरेदी विक्री करण्यास राज्यात बेमुदत बंदीची घोषणा केली आहे. टप्प्याटप्प्यात याची अंमलबजावणी होत असून बुलढाणा जिल्ह्यात देखील मुस्लिम खाटिक बांधव एकवटले आहेत. 21 जुलैपासून जिल्ह्यात बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करणार नाही असा निर्णय बुलडाणा येथील जोहर नगर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणी निश्चित वाढणार आहे.
मुस्लिम खाटिक बांधव मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. अधिकृत बाजारातून ते शेतकरी आणि इतर व्यापाऱ्यांकडून मोठी जनावरे खरेदी करतात आणि हीच जनावरे गाडीत टाकून निघतात, तेव्हा गौरक्षेच्या नावाखाली बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे तथाकथित कार्यकर्ते गाडी अडवून चालक, क्लिनर आणि व्यापाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करतात आणि जनावरे खरेदीचे कागदपत्रे असताना देखील पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतात.
advertisement
अश्या घटना वाढत असताना हा अन्याय का सहन करावा? असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिम खाटिक बांधवानी जनावरे खरेदी विक्रीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला असून बुलढाणा जिल्ह्यात देखील या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन भविष्यात शेतकरी बांधवांची अडचण समजून योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी देखील मुस्लिम खाटीक बांधवांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलढाण्यात जनावरे खरेदी विक्रीवर खाटिक बांधवांचा बहिष्कार, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement