Vande Bharat: नागपूर ते पुणे आता फक्त 12 तासांत! इतक्या रुपयांत होईल प्रवास

Last Updated:

Vande Bharat: नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडला असून रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे.

Vande Bharat: नागपूर ते पुणे आता फक्त 12 तासांत! इतक्या रुपयांत होईल प्रवास
Vande Bharat: नागपूर ते पुणे आता फक्त 12 तासांत! इतक्या रुपयांत होईल प्रवास
नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघ्या 12 तासांवर आला आहे. राज्यातील ही दोन महत्त्वाची शहरे आता अधिक वेगाने जोडली गेली आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली असून आज (10 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अजनी (नागपूर) ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडला असून रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तिकीट बूक करू शकतील.
कसे असतील तिकीट दर?
नागपूर ते पुणे: चेअर सीटसाठी 2140 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे.
advertisement
अहिल्यानगर ते पुणे: चेअर सीटसाठी 508 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 819 रुपये तिकीट आहे. जर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 1279 रुपये मोजावे लागतील.
अहिल्यानगर ते नागपूर: चेअर सीटसाठी 1410 रुपये तर एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 2867 रुपये तिकीट आहे. अहिल्यानगर ते नागपूर प्रवासादरम्यान नाश्ता आणि जेवणाची सुविधा घ्यायची असेल तर चेअर सीटसाठी 1735 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह सीटसाठी 3815 रुपये तिकीट आहे.
advertisement
वंदे भारत एक्सप्रेसमुळे पुणे-नागपूर दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. सध्या इतर एक्सप्रेस गाड्यांना या प्रवासासाठी सुमारे 15 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस केवळ 12 तासांत हे अंतर पार करणार आहे.
ही गाडी नागपूरहून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या मार्गावर अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि दौंड कॉर्ड लाईन या प्रमुख स्थानकांवर गाडीचा थांबा असेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vande Bharat: नागपूर ते पुणे आता फक्त 12 तासांत! इतक्या रुपयांत होईल प्रवास
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement