"तर कपडे फाडून...", कोल्हापुरात मनसे नेत्याचं महिलेसोबत अश्लील वर्तन, गुन्हा दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. इथं एका मनसेच्या नेत्याने महिला अधिकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे.
ज्ञानेश्वर सलोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. इथं एका मनसेच्या नेत्याने महिला अधिकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे. संबंधित नेत्याने महिलेच्या कार्यालयात जाऊन तिला धमकावलं आहे. शिवाय अश्लील शब्दात तिला शिवीगाळ करत मारहाण करण्याची देखील धमकी दिली आहे. या प्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या मनसेच्या नेत्याचं नाव असून ते मनसेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्यासह अभिजीत पाटील आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. एका राजकीय नेत्यानं सरकारी कार्यालयात जाऊन अशाप्रकारे महिलेचा विनयभंग केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत काही माहिती मागवली होती. ही माहिती देऊनही पाटील यांनी महिला अधिकाऱ्याशी वाद घातला. ही माहिती देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी विहीत आहे. असं असताना देखील ती माहिती आत्ताच दे, असं म्हणत एकेरी भाषा वापरल्याचा प्रसाद पाटील यांच्यावर आरोप आहे. शिवाय फोनवरून बोलताना संबंधित महिलेचा उल्लेख छमीया केल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
advertisement
एवढंच नव्हे तर कार्यालात जाऊन धिंगाणा घालणे, अपशब्द वापरून मोठ्याने बोलणे, शासकीय वेळ संपल्यानंतर सुद्धा रात्री उशिरापर्यंत थांबवून माहिती देण्यास भाग पाडणे. तसेच त्या महिला अधिकारी आहे म्हणून वाचल्या, पुरूष असता तर त्याला कपडे फाडून बाहेर नेऊन मारला असता अशा प्रकारचे अपशब्द वापरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रसाद पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 04, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"तर कपडे फाडून...", कोल्हापुरात मनसे नेत्याचं महिलेसोबत अश्लील वर्तन, गुन्हा दाखल


