VIDEO : कागलच्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला,यात्रेकरुंचा जीव टांगणीला,कोल्हापूरातील धक्कादायक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोल्हापूरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत कागलच्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकल्याची घटना घडली आहे. या पाळण्यात अनेक जण चढले होते. त्यामुळे हे नागरीक आता पाळण्यात अडकून पडल्याची घटना घडली आहे.
Kolhapur News : ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर : कोल्हापूरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत कागलच्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकल्याची घटना घडली आहे. या पाळण्यात अनेक जण चढले होते. त्यामुळे हे नागरीक आता पाळण्यात अडकून पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. त्यासोबत कोल्हापूरातून मनपा फायर ब्रिगेडसह रेस्कू टीम कागलच्या दिशेने रवाना झाल्या आहे. लवकरच सर्व नागरीकांचा सुखरूप बचाव करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. या घटनेने कोल्हापूरात खळबळ माजली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथे जत्रा सुरू आहे.त्यामुळे या जत्रेत मौज मजा करण्यासाठी आज अनेक नागरीकांनी गर्दी केली होती. शाळकरी मुलांना देखील दिवाळीच्या सुट्टी आहेत, त्यामुळे अनेक जण या जत्रेत आपल्या लेकरांसह पोहोचली आहेत. या यात्रेत एक जॉईंट व्हील पाळणा देखील आहे. या पाळण्यात बसून अनेकांना आनंद लुटला. पण आज अचानक हा पाळणा वरच्या दिशेने अडकून पडल्याची घटना घडली आहे.
advertisement
जॉईंट व्हील पाळणा उंचावर अडकल्याने अनेक नागरिक पाळण्यात अडकून पडले आहेत. या उंचावर अडकलेल्या पाळण्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच घटनास्थळी नागरीकांची प्रचंड गर्दी जमली आहे.तसेच या घटनेची माहिती पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच कोल्हापूरातून मनपा फायर ब्रिगेडसह रेस्कू टीम कागलच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात पाळण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच नागरीकांची सुटका होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 24, 2025 11:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : कागलच्या जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला,यात्रेकरुंचा जीव टांगणीला,कोल्हापूरातील धक्कादायक घटना

