Birth Death Registration: जन्म-मृत्यूच्या लेट नोंदणीसाठी अशा पद्धतीनं करा अर्ज; जाणून घ्या कशी चालते प्रोसेस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Birth Death Registration: तहसीलदारांच्या आदेशानेच उशिराने (लेट) जन्म व मृत्यूची नोंदी होणार आहेत. पण, नवीन नियमानुसार नेमका अर्ज कसा, कोठे, कोणत्या स्वरुपात करायचा याची माहिती येथे देण्यात आली आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारकडून ऑगस्ट 2023 मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी कायदा 1969 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. एक वर्षानंतरच्या जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता न्यायालयाच्या आदेशाची गरज भासणार नाही. पूर्वीप्रमाणे तहसिलदारांच्या आदेशाने ही नोंद सरकार दरबारी होणार आहे.
उशिरा (लेट) नोंद करण्यासाठी तहसिलदारांच्या नावे अर्ज करून प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. केंद्र सरकारने 11 ऑगस्ट 2013 च्या राजपत्रानुसार जन्म- मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा 2023 मंजूर केला. त्यात 30 दिवसानंतर व एक वर्षानंतरच्या जन्म व मृत्यूच्या नोंदणीसाठीच्या तरतुदीत सुधारणा केली. त्यानुसार आता पूर्वीप्रमाणेच तहसीलदारांच्या आदेशानेच उशिराने (लेट) जन्म व मृत्यूची नोंदी होणार आहेत. पण, नवीन नियमानुसार नेमका अर्ज कसा, कोठे, कोणत्या स्वरुपात करायचा याची माहिती अनेकांना नाही.
advertisement
जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणांनुसार केंद्राने विलंबाने होणाऱ्या नोंदणीसाठी तीन टप्पे दिले आहेत. पहिल्या टप्प्यात जन्म किंवा मृत्यू झाल्यापासून 30 दिवसापर्यंत विनाशुल्क व आदेशाशिवाय नोंदणी करता येईल. दुसऱ्या टप्प्यात 30 दिवस ते एक वर्षापर्यंत निबंधकांना म्हणजेच जिल्हा निबंधक किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने जन्म- मृत्यूची नोंदणी करता येते. ग्रामसेवकांसाठी गटविकास अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सक्षम प्राधिकारी असतात. तिसऱ्या टप्प्यात जन्म- मृत्यू झाल्यापासून एक वर्षानंतरच्या नोंदी पूर्वीप्रमाणे तहसीलदारांच्या आदेशाने होणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीसाठी विहित शुल्काची आकारणी होईल.
advertisement
जन्म-मृत्यूच्या लेट नोंदीसाठी अर्ज कसा करावा -
जन्म- मृत्यू झाल्यापासून एक वर्षानंतरच्या नोंदी पूर्वीप्रमाणे तहसीलदारांच्या आदेशाने होणार आहेत. त्यासाठी
1) तहसिलदारांच्या नावे साधा अर्ज (लेट नोंद व्हावी)
2) प्रतिज्ञापत्र (अफिडॅव्हिट करणे)
3) ग्रामपंचायतीत नोंद नसलेचा दाखला
3) अर्जदार/ पालकांचे आधार कार्ड
advertisement
वरील कागदपत्रे तहसिलदार कार्यालयात रजिस्टर टपालाद्वारे अथवा समक्ष भेटून जमा करावीत. त्याची पोहच घ्यावी. वरील प्रमाणे विहीत पद्धतीत अर्ज सादर केल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आत नोंद करणे कामी तहसिलदारांचा आदेश अर्जदाराला दिला जाईल. हा आदेश लोकल प्रशासनाकडे (ग्रामपंचायत इ.) नेवून लेट नोंद व शुल्क भरून दाखला देण्याची कार्यवाही केली जाईल.
advertisement
तत्पूर्वी अर्ज/प्रकरण दाखल झाल्यानंतर तहसिलदार कार्यालयाकडून याची मंडळ (सर्कल) अधिकाऱ्याकडून चौकशी होते. जन्म किंवा मृत्यूची सत्यता पडताळणी होते. यामध्ये अर्जदारांना मंडळ अधिकारी चौकशीसाठी बोलावू शकतात. त्याशिवाय दोन लोकांकडून जबाब नोंदवला जातो. खासगी दवाखान्यात जन्म झाला असल्यास तेथे चौकशी केली जाते. याचा जबाब तहसिलदार कार्यालयाकडे येतो. चौकशीनंतर काही अडचण नसल्यास ग्रामपंतायतीत लेट नोंद करण्याचा आदेश तहसिलदार देतात. यासंबंधी पन्हाळा तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार संजय वळवी यांनी सविस्तर माहिती दिली.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 21, 2024 5:04 PM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
Birth Death Registration: जन्म-मृत्यूच्या लेट नोंदणीसाठी अशा पद्धतीनं करा अर्ज; जाणून घ्या कशी चालते प्रोसेस