पावसाचा कहर! राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाचा हाय अलर्ट!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मागील काही दिवसांपासून घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील कृष्णा, कोयना आणि वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. हिप्परगी, अलमट्टी आणि कोयना या धरणांमधून...
कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना आणि वारणा या नद्यांच्या पातळी मोठी वाढ झालेली आहे. यामुळे हिप्परगी, अलमट्टी, कोयना या मोठ्या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. ही माहिती सांगली पाटबंधारे विभागाचे अभियंता नितीन भोजकर यांनी दिली आहे.
हिप्परगी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले
चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने हिप्परगी धरणाचे दरवाजे काही काळ बंद केले होते; पण शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने संध्याकाळी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. सध्या हिप्परगी धरणात 67 हजार 300 क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर 66 हजार 550 क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे राजापूर बंधाऱ्यातून 79 हजार क्युसेक पाणी कर्नाटकात सोडले जात आहे.
advertisement
कृष्णा नदीतील प्रवाह वाढला
अलमट्टी धरणातूनही पाण्याची आवक आणि विसर्ग वाढला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील प्रवाह खूपच वाढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजता दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. यामुळे सध्या 29 हजार 646 क्युसेक पाणी सोडले जात आहे. शनिवारी रात्री नदीची पातळी 25 फूट होती; पण रात्रीतून जोरदार विसर्ग झाल्याने ती वाढून 29 फूट 4 इंच झाली.
advertisement
34 तासांत पंचगंगा नदीपातळीत 7 फूटांची वाढ
रविवार दिवसभरात ती आणखी वाढून 32 फुटांवर पोहोचली. हे वाढते पाणी लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. वारणा नदीतून सध्या 15 हजार 75 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात वाढून पुलाजवळ 41 फूट झाली आहे, तर राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. 24 तासांत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांची वाढ झाली आहे.
advertisement
हे ही वाचा : जन्मदाखल्यावर QR कोड नाही? मग 'आधार कार्ड' मिळणार नाही; शासनाचा नवा नियम, नागरिकांना त्रास!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
पावसाचा कहर! राजाराम बंधाऱ्यातून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाचा हाय अलर्ट!