पुढील 3 तास महत्त्वाचे, कोल्हापुरात हवामान विभागाचा रेड अलर्ट, वादळी पाऊस होण्याची शक्यता
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने आज 17 मार्च रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांमध्ये जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने आज 17 मार्च रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांमध्ये जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये विजांचा कडकडाट, तीव्र वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार, या स्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने सर्व यंत्रणांना तत्काळ सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
कोल्हापुर जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा तसेच अत्यावश्यक कार्य न करता रस्त्यावर न जाण्याचा सल्ला दिला आहे. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची, तसेच विजेच्या धक्क्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने सर्व नागरिकांना अति आवश्यक बाबींसाठी बाहेर न पडण्याचे, तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
सतर्क राहा, यंत्रणांना सूचना
हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर, पोलिस, आपत्कालीन सेवा, आरोग्य विभाग अशा विभागांना स्थानिक प्रशासनाकडून यापूर्वीच सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रशासना कडून वादळाच्या परिस्थितीमध्ये रस्त्यांवर मोठे झाडे पडण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळ तसेच वाहतुकीला अडचणी निर्माण होऊ होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. वाहनधारकांना अतिरिक्त काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच, नदी किनाऱ्यांवर राहणाऱ्या नागरिकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना
वीज आणि वादळापासून सुरक्षित रहावे, पाऊस आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटू शकतात, म्हणून घरामध्ये राहणे अधिक सुरक्षित ठरेल.
वाहनधारकांनी विशेष काळजी घ्यावी, अलीकडे कोल्हापुरात झाडं कोसळण्याची, तसेच रस्ते धुंद होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी.
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपली सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी आवाहन करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 17, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पुढील 3 तास महत्त्वाचे, कोल्हापुरात हवामान विभागाचा रेड अलर्ट, वादळी पाऊस होण्याची शक्यता


