Kolhapur Crime : सातारा महिला डॉक्टर प्रकरणानंतर कोल्हापूरात सुन्न करणारी घटना! 14 वर्षाच्या मुलीसोबत नको ते घडलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या करवीर तालुक्याच्या पश्चिम दिशेच्या एका गावात एका नराधम बापानेच आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Kolhapur Crime News : साताऱ्यातील महिला डॉक्टरने पीएसआयच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अशातच आता शेजारील जिल्ह्यात म्हणजे कोल्हापूरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आलीये. कोल्हापूरच्या करवीर तालुक्याच्या पश्चिम दिशेच्या एका गावात एका नराधम बापानेच आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ही संतापजनक घटना आहे.
मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती उत्सवाच्या दरम्यान या नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीच्या आईने हे कृत्य पाहिले आणि त्यानंतर तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
नराधम बापावर गुन्हा दाखल
advertisement
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर करवीर पोलीस ठाण्यात या नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या नराधम बापाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
advertisement
दरम्यान, दुसरीकडे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. कागल तालुक्यातील बेनिग्रे गावातील आपल्या मालकीची झाड आणि शेड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर पाडल्याचा आरोप शिक्षकाचा आहे. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टाळल्याचं पहायला मिळालं.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Oct 25, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Crime : सातारा महिला डॉक्टर प्रकरणानंतर कोल्हापूरात सुन्न करणारी घटना! 14 वर्षाच्या मुलीसोबत नको ते घडलं







