Kolhapur News: अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामाला वेग, 10 दिवसांत 48 खांब उभारणार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील बहुप्रतिक्षित गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंजूर केलेल्या...
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील बहुप्रतिक्षित गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी थांबलेले हे काम आता नव्या जोमाने सुरू झाले असून, सोमवारी मंडपाचे पहिले आठ खांब यशस्वीरित्या उभारण्यात आले. येत्या दहा दिवसांत एकूण 48 खांब उभारण्याचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.
येत्या 2 महिन्यांत गरुड मंडपाचे काम होणार पूर्ण
देवस्थान समितीने या कामासाठी 12 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दोन महिन्यांपूर्वी लाकडी खांब उभारण्याचे काम सुरू झाले होते, मात्र मोजमापात चूक झाल्याने ते थांबवण्यात आले होते. आता हे काम पुन्हा सुरू झाले असून, मंगळवारपासून दुसऱ्या टप्प्यातील खांबांसाठी लाकडी रचना मांडण्यास सुरुवात झाली आहे. "येत्या दोन महिन्यांत गरुड मंडपाचे सर्व खांब आणि कमानी उभारण्यात येतील," अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
advertisement
जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती पाहणी
एकीकडे गरुड मंडपाचे काम सुरू असतानाच, दुसरीकडे मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याच्या कामालाही वेग आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुरातत्व विभागाच्या पथकासह मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या कामांचे अंदाजपत्रक बनवण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.
उच्चाधिकार समितीने मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाणे आणि त्यांच्या टीमने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातील खराब झालेली शिल्पे, सुटलेले दगड, भिंतीतील गळती, दगडांवरील बारीक नक्षीकाम आणि परिसरातील लहान मंदिरांची पाहणी केली.
advertisement
हे ही वाचा : Marathwada Rain: मराठवाड्यात हवापालट, पावसाचा जोर ओसरला, छ. संभाजीनगर ते बीड आजचं हवामान अपडेट
हे ही वाचा : Pune News: ढोल-ताशांचा गजर अन् कोट्यवधींचं अर्थकारण, गणेशोत्सवात होते 50000000 रुपयांची उलाढाल
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 30, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामाला वेग, 10 दिवसांत 48 खांब उभारणार!









