Shivrajyabhishek Sohala : कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, काय आहे परंपरा?
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Shivarajyabhishek Din: कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.
कोल्हापूर : नवीन राजवाड्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा झाला. खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. त्याचवेळी किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीतही शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. कोल्हापुरातील नवीन राजवाड्याच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याने शिवप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह निर्माण केला.
सोहळ्याच्या सुरुवातीला पारंपरिक मंत्रोच्चाराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी पोवाड्यांच्या माध्यमातून शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या गाथा सादर करण्यात आल्या. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नवीन राजवाड्याच्या दरबारात आयोजित हा सोहळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरला. कोल्हापुरात नवीन राजवाड्याच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्याला विशेष महत्व आणि परंपरा आहे. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी एडवोकेट राजेंद्र चव्हाण यांनी या परंपरेचे महत्त्व सांगितले.
advertisement
"शिवराज्याभिषेक सोहळा हा स्वराज्याच्या मूल्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अमूल्य ठेवा आहे. हा सोहळा प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमान, एकता आणि कर्तृत्वाची प्रेरणा देतो," असे चव्हाण म्हणाले. ट्रस्टतर्फे दरवर्षी हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
advertisement
दरम्यान, या सोहळ्यास कोल्हापूरसह परिसरातील गावांमधून हजारो शिवभक्त उपस्थित होते. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषा आणि शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. शाहू महाराजांनी उपस्थितांना स्वराज्याचे तत्त्व अंगीकारण्याचे आणि शिवरायांचा आदर्श पुढे नेण्याचे आवाहन केले. हा सोहळा कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमानास्पद क्षण ठरला.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jun 06, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Shivrajyabhishek Sohala : कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, काय आहे परंपरा?









