advertisement

Krushi Market Rate: कांद्याचे दर पुन्हा ढासळले, सोयाबीनला सर्वाधिक दर; इतर शेतमालांची स्थिती काय?

Last Updated:

Krushi Market Today Rate: सोमवार, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: सोमवार, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 52 हजार 527 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये 15 हजार 304 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1403 ते जास्तीत जास्त 1730 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 527 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 1लाख, 96 हजार 081 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 01 हजार 182 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 354 ते 1876 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 882 क्विंटल पांढर्‍या कांद्यास 200 ते 3300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 86 हजार, 152 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 19 हजार 032 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4100 ते 4705 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 12हजार, 117 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 6000 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate: कांद्याचे दर पुन्हा ढासळले, सोयाबीनला सर्वाधिक दर; इतर शेतमालांची स्थिती काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement